esakal | आश्‍चर्यच..काटेरी झुडूप म्‍हणून बससेवाच बंद
sakal

बोलून बातमी शोधा

parivahan bus service stop

महामंडळाची बससेवा हळूहळू रोडावर येत आहे. कोरोना महामारीत पुर्णपणे कोलमडलेल्‍या आर्थिक स्‍थिती वर येत महामंडळाची बस पुन्हा एकदा ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांवर धावतांना दिसत आहे. कोरोनातून सावरल्‍यानंतर अगदी एका वेगळ्याच कारणाने बससेवा बंद करण्याचा निर्णय जळगाव आगाराने घेतला आहे. 

आश्‍चर्यच..काटेरी झुडूप म्‍हणून बससेवाच बंद

sakal_logo
By
राजेंद्र पाटील

नांद्रा (ता.पाचोरा ) : जळगाव- म्हसावद मार्ग एरंडोल मुक्कामाची बस तसेच पाचोरा- माहेजी- दहिगाव- बोरनार- म्हसावद मार्गे एरंडोल जाणाऱ्या बस रस्‍त्‍यावर वाढलेल्‍या काटेरी झुडपांमुळे बंद करण्याचा आश्‍चर्यकारक निर्णय घेतला आहे. 
कोरोनामुळे करण्यात आलेल्‍या लॉकडाउनमध्ये रस्‍त्‍यांवर वाहतुक पुर्णपणे बंद होती. यात अतिपाऊस झाला. परिणामी रस्‍त्‍याच्या दोन्ही बाजूंनी गवत आणि काटेरी झुडूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे चक्‍क बससेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. 

ग्रामपंचायतींना पत्र
जळगाव, पाचोरा, एरंडोल आगाराने रस्त्यावर वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे बससेवा बंद करण्याबाबतचे लेखी पत्र (ता.9) दहिगाव व कुरंगी ग्रामपंचायतीना दिले आहे. पत्रात म्हटले, आहे की बोरणार, दहिगाव भागातील रस्त्याच्या कडेला मोठमोठी काटेरी झुडपे वाढल्यामुळे वाहने चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते म्हणून ह्या मार्गावरील बसेस बंद करण्यात आलेल्या असल्याचे लेखी पत्र जळगाव आगार प्रमुखांकडून सदर ग्रामपंचायतीना देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आता ही जबाबदारी कोणाची
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपे काढण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. वारंवार तक्रारी करुन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळेच बस बंद झाल्याचा आरोप डोकलखेडा सरपंच महेंद्र पाटील व कुरंगीचे माजी सरपंच गजानन पवार यांनी केला आहे. दिवाळीच्या तोंडावर माहेजी, दहिगाव मार्ग एरंडोल व जळगाव जाणाऱ्या बस बंद झाल्यामुळे प्रवाशांची फसगत होत आहे. शासन स्‍तरावरील योग्य त्या उपाय योजना आखुन काटेरी झुडपांची छाटनी करुन रस्ता मोकळा करुण देण्याची मागणी होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top