जळगावहून आता वापी अन्‌ अंकलेश्‍वर; नाशिक, मुंबईसाठीचेही असे आहे नवे शेड्युल्‍ड

राजेश सोनवणे
Sunday, 13 September 2020

कोरोना व्‍हायरसमुळे पुकारण्यात आलेल्‍या लॉकडाउनमध्ये महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाची सेवा पुर्णपणे कोलमळली होती. देशात अनलॉक सुरू झाल्‍यानंतर महामंडळाची बससेवा हळूहळू पुर्वपदावर येवू लागली आहे. याला मालवाहतुक आणि पंधरा दिवसांपुर्वी सुरू झालेली आंतरजिल्‍हा बससेवेचा भाग आहे.

जळगाव  कोरोनामुळे थांबलेल्‍या बस नव्या दमाने धावू लागल्‍या आहेत. यामुळे बसचा स्‍पिड देखील वाढू लागला आहे. आंतरजिल्‍हा बस सेवा सुरू झाल्‍यानंतर वीस टक्‍के सेवा पुर्वपदावर आली आहे. मात्र आता आंतरराज्‍य सेवा सुरू करून प्रवाशांची सुविधा केली जात आहे. यात जळगावहून आता वापी आणि अंकलेश्‍वर येथे बस सोडण्याचे नियोजन जळगाव आगाराकडून आखण्यात आले आहे.

कोरोना व्‍हायरसमुळे पुकारण्यात आलेल्‍या लॉकडाउनमध्ये महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाची सेवा पुर्णपणे कोलमळली होती. देशात अनलॉक सुरू झाल्‍यानंतर महामंडळाची बससेवा हळूहळू पुर्वपदावर येवू लागली आहे. याला मालवाहतुक आणि पंधरा दिवसांपुर्वी सुरू झालेली आंतरजिल्‍हा बससेवेचा भाग आहे. परंतु बस आगारातून प्रवाशांची मागणी लक्षांत घेऊन उद्यापासून (ता.१४) राज्यांतर्गत व आंतरराज्य बस सेवेस प्रारंभ करण्यात येत आहे. 

नव्या शेड्युल्‍डने फेऱ्या पोहचणार ५० टक्‍के
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची राज्यांतर्गत व आंतरराज्य बस सेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊनच्या काळात बंद होती. आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने व प्रवाशांची मागणी लक्षांत घेतून जळगाव आगारातून बससेवेस प्रारंभ करण्यात येत आहे. उद्यापासून (ता.१४) आंतरराज्य बस सेवेस देखील प्रारंभ होत आहे. संपुर्ण कोलमडलेले शेड्युल्‍ड पुर्वपदावर येवू लागलू असून या बसफेऱ्यांमुळे जळगाव विभागाचे ५० टक्‍के शेड्युल्‍ड पुर्वपदावर येणार आहे. 

पुण्यासाठी सीटर प्लस स्‍लिपर सेवा
जळगाव विभागाकडून पुण्यासाठी यापुर्वीच बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र आता पुण्यासाठी जळगावहून सीटर प्लस स्‍लीपर बसफेरी सुरू करण्यात येणार आहे. याची सुरवात १८ सप्टेंबरपासून करण्यात येत असून रोज रात्री आठ वाजता ही सुटणार असल्‍याचे आगार व्यवस्थापक निलेश पाटील यांनी सांगितले.

असे आहे शेड्युल्‍ड

बसफेरी………………...वेळ
जळगाव ते वापी……….सकाळी ८ वाजता 
वापी ते जळगाव………सकाळी ७.४५. 
जळगाव ते अंकलेश्वर…..सकाळी ८.३०. 
अंकलेश्वर ते जळगाव.....सकाळी ७.३०. 
जळगाव ते नाशिक....... सकाळी १०. 
नाशिक ते जळगाव....... सकाळी ७. 
जळगाव ते मुंबई......... सकाळी ७.३०. 
मुंबई ते जळगाव........ सकाळी ७.३०.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon parivahan bus start service tomorrow in interstate