वय ५५ वर्ष..आणि चोविस तासात गाठला चारशे किलो मिटरचा पल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Inspector Dhananjay Mahadev Yerule

गेल्या चार वर्षापासून सायकल रायडींगचा छंद त्यांना जडला असून नियमित सायकलींग करत असतांना अनेक लहान मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.

वय ५५ वर्ष..आणि चोविस तासात गाठला चारशे किलो मिटरचा पल्लाजळगाव ः औरंगाबाद येथे १४ व १५ ऑगस्ट या दोन दिवशी पॅरिस येथील ऑडिक्स या कंपनीतर्फे `ऑडिक्स इंडिया`(Audix India) या नावाने सायकल रायडिंग स्पर्धेचे (Bicycle riding competition)आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील सायकल रायडर्स सहभागी झाले होते. यात जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय महादेव येरुळे (Police Inspector Dhananjay Mahadev Yerule) यांनी २४ तास ४० मिनिटात ४०० किलोमीटरचा पल्ला गाठला.

हेही वाचा: दायमा अनेकदा संतापले..आणि कानफटातही मारली-मंत्री गुलाबराव पाटील


मुळ लातूर येथील रहिवासी पंचावन्न वर्षीय पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्‍हा पोलिस दलात कार्यरत असून संवेदनशील अशा शहर पोलीस ठाण्याचा पदभार त्यांच्याकडे आहे. निरोगी राहण्यासाठी गेल्या चार वर्षापासून सायकल रायडींगचा छंद त्यांना जडला असून नियमित सायकलींग करत असतांना अनेक लहान मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. सोबतचे अधीकारी आणि कर्मचाऱ्यांना सायकलींग अथवा कुठल्याही खेळासाठी वेळ काढण्याबाबत उद्दुक्त करुन आरोग्याच्या काळजीबाबत जागृती करत असतात.

औरंगाबाद येथील स्पर्धेत सहभाग

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन औरंगाबाद येथील ऑडिस्क इंडिया या सायकल रायडिंग स्पर्धेची माहिती मिळाली. त्यात धनंजय येरुळे हे ४०० किलोमीटर साठी सहभागी झाले. ठरल्या प्रमाणे २७ तासात ही स्पर्धा त्यांना पूर्ण करावयाची होती. १४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील क्रांती चौकातून सकाळी ६ वाजता सुरुवात झाली. औरंगाबाद, ते देवगड फटा, तेथून पुन्हा औरंगाबाद ते मांजरसोफा पुन्हा क्रांती चौकात परत अशी स्पर्धा झाली. येरुळे यांनी २४ तास ४० मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेची माहिती पॅरिस येथे जाणार असून ते मुल्यांकनानंतर प्रमाणपत्र व मेडल दिली जाणार असल्याचे पोलीस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी सकाळ शी बोलतांना सांगितले.

हेही वाचा: खानदेश,कसमादे पट्ट्यात दुष्काळसदृश परिस्थिती-आमदार गिरीश महाजन

सायकलींगने दिली उर्जा
पोलिस खात्यातील ताण-तणावातून नैराश्य आणि थकवा येण स्वाभावीक आहे पण, खेळाचा छंद असेल तर व्यक्ती आशावादी होते. वयाची पन्नाशी गाठल्यावर छंदातूनच सायकलींगकडे वळलो. रात्रपाळीची ड्यूटी, कायदा व सुव्यवस्थेची परीस्थीती हाताळून अपवाद वगळता दररोज ३०-४० किलोमिटर सायकलींगचा सराव आणि व्यायाम होतो. सायलींगमुळे शरीरात उर्जा, उत्साह संचारतो सोबतचा आंनदी राहण्यास मदत ही मिळते.
- धनंजय येरुळे
वरीष्ठ निरीक्षक, शहर पोलिस ठाणे जळगाव

Web Title: Marathi News Jalgaon Police Success Inspector In Cycle Riding Competition At Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..