ना लग्न सराई... ना युद्धजन्य स्थिती...तरी सोन्याला झळाळी, चांदीला चकाकी 

देविदास वाणी
Wednesday, 22 July 2020

सोन्याचा दर (प्रति तोळा) काल विना जीएसटी पन्नास हजार होता. आज विना जीएसटी दरात १ हजारांची वाढ झाली. यामुळे ५१ हजारांपर्यंत गेला. त्यात जीएसटी’ची रक्कम मिळविली.

जळगाव  ः सोने बाजारात आज सोन्याच्या दराने १ हजार रुपयांची उसळी घेतली. सोन्याचा प्रती तोळे दर ५२ हजार ५३० वर पोचला आहे.

सोन्याच्या दरात आतापर्यंतचा सर्वोच्च दर असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. सोन्याबरोबरच चांदीचे दर प्रतिकिलो ६२ हजार ३१५ पर्यंत पोचला आहे. अचानक झालेल्या वाढलेल्या दरामुळे सराफ व्यावसायीकही चक्रावले आहे. सध्या ना लग्न सराई ना युद्धजन्य स्थिती आहे. तरीही वाढ झाली आहे. 

सोन्याचा दर (प्रति तोळा) काल विना जीएसटी पन्नास हजार होता. आज विना जीएसटी दरात १ हजारांची वाढ झाली. यामुळे ५१ हजारांपर्यंत गेला. त्यात जीएसटी’ची रक्कम मिळविली तर तो दर ५२ हजार ५३० पर्यंत पोचला. वाढत्या मागणीमुळे चांदीचे दरातही वाढ झाली आहे. आज चांदी प्रती किलो ६२ हजार ३१५ (जीएसटी सह)आहे. 
पावसाळा सुरू आहे. लग्न सराईनाही, कोणते सण नाही. युध्दजन्य स्थिती नसली तरी दर वाढल्याने आगामी काळात लग्न होणाऱ्या संभाव्य वधूवरांच्या कुटुंबीयांमध्ये दर आणखी किती वाढतील याबाबत चिंतेचे वातावरण आहे. 

अमेरिकेत पॅकेज वाढले अन सोन्याची मागणीही 
अमेरिकेत लवकरच निवडणुका होणार आहे. त्या समोर ठेवून अमेरिका शासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या पॅकेजमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. पैसा ठेवून कोठे ठेवायचा, बॅकेतही व्याजदर कमी आहेत. यामुळे तेथील नागरिकांची सोन्याला अधिक मागणी आहे. मागणी वाढल्याने ही वाढ झाली आहे, अशी माहिती रतनलाल सी.बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी दिली. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon price hike made gold and silver shined