esakal | बीएचआर प्रकरणः मालमत्ता व्यवहारांच्या तपासावर होणार ‘फोकस’
sakal

बोलून बातमी शोधा

BHR

बीएचआर प्रकरणः मालमत्ता व्यवहारांच्या तपासावर होणार ‘फोकस’

sakal_logo
By
टीम ई सकाळजळगाव : बीएचआर पतसंस्थेतील (BHR Credit Society) कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहार (Scam) प्रकरणात आतापर्यंतच्या तपासात अनेक गंभीर तथ्ये समोर येत आहेत. गेल्या महिन्यातील अटकसत्र पावत्या मॅचिंगच्या आधारावर राबविण्यात आले. आता तपासाचा (Investigation) फोकस बीएचआरच्या मालमत्ता लिलाव, विक्रीच्या व्यवहारांवर केंद्रित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(bhr credit society scam property investigation focus by police)

हेही वाचा: राउटर,लॅपटाॅप,फोनचा वायफाय पासवर्ड कसा बदलायचा,जाणून घ्या सोपी प्रक्रिया


भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत संचालक मंडळाने केलेल्या ३० कोटींच्या गैरव्यवहारात संचालक, व्यवस्थापक, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यांना अटकही झाली. पतसंस्था अवसायनात निघाल्यानंतर अवसायक म्हणून जितेंद्र कंडारेची नियुक्ती झाल्यानंतर कंडारेने पावत्या मॅचिंग, संस्थेच्या मालमत्ता लिलाव व विक्रीत कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुणे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

वेगवेगळ्या पैलूंनी तपास
या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा विविद पैलूंनी तपास करीत आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये या प्रकरणात पहिल्या टप्प्यातील अटकसत्र राबविण्यात आले. नंतर गेल्या महिन्यात दुसऱ्या टप्प्यात उद्योजक, व्यावसायिकांना अटक झाली. या सर्वांकडून प्राप्त माहितीनुसार ठेव पावत्यांच्या मॅचिंगद्वारे कर्जफेडीचे कोटींचे व्यवहार समोर आले. त्यादृष्टीने तपास केल्यामुळे अशा अनेक ठेव पावत्या ३०-४० टक्के रक्कम देऊन सेटल करण्यात आल्या. ज्यांनी अशाप्रकारे कर्ज सेटलमेंट केली, ती सर्व मंडळी या प्रकरणात गोत्यात आली.

हेही वाचा: काळोख्या रात्रीचा थरार..कुटूंब गाढ झोपेत आणि मांजर-नागाची झुंज

मालमत्तांचे व्यवहार रडारवर
जितेंद्र कंडारे याला संस्थेच्या प्रत्येक मालमत्तेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार होते. बड्या कर्जदार, संचालकांना नोटीस बजावून त्यांची मालमत्ता जप्त करून, तसेच संस्थेच्या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करून त्या रकमेतून ठेवीदारांचा पैसा परत करणे अपेक्षित असताना एकीकडे ठेवीदारांची २०-३० टक्क्यांवर बोळवण करत संस्थेच्या मालमत्ता कवडीमोल दरात लिलावाद्वारे विक्री केल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. आता या मालमत्तांचे सर्व संशयास्पद व्यवहार तपासाचा फोकस असतील. ज्यांनी अशा मालमत्ता विकत घेतल्या, विक्रीत सहभाग घेतला, अन्यत्र वर्ग केल्या अशा सर्वांची चौकशीही होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कोट्यवधींच्या मालमत्तांचे व्यवहार करणारे जिल्ह्यातील काही दिग्गज नावे समोर येण्याची शक्यता आहे.

loading image