जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; गारठा वाढला

देवीदास वाणी
Saturday, 12 December 2020

सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळयातील अवकाळी पावसाने नागरिकांना रेनकोट, छत्रीचा वापर करणे गरजेचे झाले आहे. तापमानात कमालीची घट झाली आहे.

जळगाव : उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसामुळे जळगाव जिल्हयात आज पूणतः ढगाळ वातावरण होते. अनेक ठिकाणी पा उसही झाला. शहरात दूपारनंतर पावसाची रिपरिप सूरू होती. सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. शहरात अनेक ठिक़ाणी खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचल्याने वाहनधारकांचे हाल झाले. 

सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळयातील अवकाळी पावसाने नागरिकांना रेनकोट, छत्रीचा वापर करणे गरजेचे झाले आहे. तापमानात कमालीची घट झाली आहे. आजचे किमान १८ अंशापर्यंत खाली आले. तर कमाल तापमान २५ अंश होते. 

मंगळवारनंतर थंडीची शक्‍यता
उत्तर भारतात परतीचा मॉन्सून सुरू झाल्याचा हा परिणाम आहे. आजपासून ते १६ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने विर्तविला आहे. १६ डिसेंबरनंतर थंडीच्या लाटेची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. कालपासून ढगाळ वातावरण सुरू झाले, असे वातावरण १६ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. याचा फायदा रब्बीच्या पिकांना होणार आहे. गहू, हरभरा, ज्वारी, दादर आदी एका पाण्यावर येणाऱ्या पिकांना थंडीचा लाभ होईल अशी माहिती कृषी विभागाने दिली. मात्र ढगाळ वातावरण नको. दोन तीन दिवस सलग ढगाळ वातावरण असल्यासे पिकांवर अळ्यांचा प्रादूर्भाव होईल. यामुळे सूर्यप्रकाशाची गरज असल्याचे सांगण्यात आले. ढगाळ वातावरण व पावसामुळे हवेतील गारठा वाढला होता. यामुळे जो-तो गरम कपडे घालूनच बाहेर पडताना दिसत होता. 

थंडी, तापाचे रुग्ण वाढीची शक्यता 
हवेतील वाढलेला गारठा वाढल्याने थंडी, सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना थंडीचा अधिक त्रास होतो. थंडीमुळे ज्येष्ठांना अंगदूखी, गूडघे दुखी असे विकार उदभवतात. सध्या कोरोना संसर्गाची लाट नाही मात्र संसर्ग सूरू आहे. त्यात सर्दी, खोकला झाल्यास अशा रुग्णांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती शहरातील डॉक्टरांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon rain coming and climate change