
गेल्या तीन- चार दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. आजपासून ढगाळ वातावरण सूरू झाले. असे वातावरण १६ डिसेंबरपर्यंत राहिल. त्यात मध्येच पाऊसही होईल
जळगाव : उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. उत्तर भारतात परतीचा मान्सून सुरू झाल्याचा हा परिणाम आहे. उद्यापासून (ता.१२) सोळा डिसेंबरपर्यत जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाउस पडेल असा अंदाज हवामान विभागाने विर्तविला आहे. सोळा डिसेंबरनंतर थंडीच्या लाटेची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
गेल्या तीन- चार दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. आजपासून ढगाळ वातावरण सूरू झाले. असे वातावरण १६ डिसेंबरपर्यंत राहिल. त्यात मध्येच पाऊसही होईल. नंतर मात्र थंडीचा लाट येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आताच रब्बीच्या पेरणीच्या कामे वेगात करावी, जेणे करून त्याचा फायदा थंडीचा लाटेत पिकांना होईल.
उन्ह आणी ढगाळ वातावरण
सकाळपासून ढगाळ वातावरण होते. नंतर काही वेळ सूर्यप्रकाश पडला. नंतर मात्र दिवसभर ढगाळ वातावरण दिवसभर राहिल्याने ज्येष्ठांना स्वेटर, मफरल, गरम कपडे परिधान करावे लागल्याचे चित्र होते.
आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोळा डिसेंबरपर्यत असेच वातावरण राहून काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. सोळा नंतर थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे आहेत.
- निलेश गोरे, हवामानतज्ञ.
संपादन ः राजेश सोनवणे