
खाक्या दाखवताच त्याने चोरीच्या तीन मोटारसायकली काढून दिल्या सरंपचासह या चौकडीने आणखीन वाहनांची विल्हेवाट लावली असण्याची शक्यता असून पोलिस कोठडीत इतर माहिती समोर येणार आहे.
जळगाव : स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने औरंगाबाद येथून दुचाकी चोरटा अटक केला होता. आठ दुचाकी या चोरट्या कडून जप्त करुन अधीक तपासा करीता एमआयडीसी पेालिसांना सेापवण्यात आले होते. पथकाने अधीक तपासात त्याचे साथीदार आणि इतर वाहनांचा शोध लावला असून चक्क जरंडी (ता. सोयगाव) येथील सरपंचाला तीन दुचाकींसह पेालिसांनी अटक केली आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील जमिल आयुब शेख याला औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी परिसरातून अटक केली होती. अटकेनंतर जमीलने शेंदुर्णी व पहूर भागातून चोरुन नेलेल्या आठ मोटारसायकली काढून दिल्या. अधीक तपासाकरीता संशयीताला एमआयडीसी पेालिसांच्या स्वाधीन केल्यावर उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, तपासाधिकारी गणेश शिरसाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसींग पाटील यांच्या पथकाने जमील अय्युब शेख याची पेालिस कोठडीत खातर पानी केल्यावर त्याने इतर अतिरीक्त गुन्ह्यांसह साथीदारांची नावे सांगीतली. त्यात सुनील बल्लू पवार(वय-३०, जरंडी), समाधान रघुनाथ हुडीकर(वय-२९), शेख शफीक शेख भैय्या (वय-२५) अशांची नावे समोर आल्यावर एमआयडीसीच्या डीबी पथकाने तीघांना ताब्यात घेतले
जमीलसह सरपंचाची खातरपाणी
एमआयडीसी पेालिसांनी जमील शेख याला ताब्यात घेवून लगेच त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेत चौकशी चालवली. त्यात जरंडी(ता.सोयगाव) येथील सुनील बल्लू पवार हा चक्क सरपंच असल्याचे आढळून आले. पोलिसांना रुबाब दाखवणाऱ्या सरपंचाला..खाक्या दाखवताच त्याने चोरीच्या तीन मोटारसायकली काढून दिल्या सरंपचासह या चौकडीने आणखीन वाहनांची विल्हेवाट लावली असण्याची शक्यता असून पोलिस कोठडीत इतर माहिती समोर येणार आहे.
संपादन ः राजेश सोनवणे