esakal | ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी यांचे निधन 
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी यांचे निधन 

डॉ. प्रभाकर चौधरी यांनी प्रामुख्याने बालसाहित्य समृद्ध केले आहे. कथापुष्प, महात्मा गांधी कथामाला, आधुनिक नितीकथा आशा काही पुस्तकांचे एकापेक्षा जास्त भाग प्रकाशित केले.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी यांचे निधन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : शहरातील विद्यानगरमधील राहिवासी बी.एड. कॉलेजचे माजी प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक डॉ.प्रभाकर श्रावण चौधरी (वय 81) यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी प्रा.शोभा, 3 मुली, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. देवदत्त चौधरी यांचे ते वडील होत. 

अल्पपरिचय... 
 
प्रा. प्रभाकर चौधरी हे मूळ सांगवी (ता. यावल) येथील रहिवासी. या गावीच त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी यावल, पाचोरा, जळगाव येथे केले. एमए, एमएड पूर्ण करुन त्यांनी पीच.डी.ही प्राप्त केली. 36 वर्षांचा दीर्घकाळ ते अध्यापन करीत होते. शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य या पदावर काम करुन त्यांनी शिक्षणक्षेत्रात सेवा दिली. शिक्षण, साहित्य व ग्रंथालय चळवळ हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. पुणे व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.फिल व पीएच.डी. पदवीसाठी संशोधक मार्गदर्शक होते. शैक्षणिक, साहित्यविषयक, वैचारिक आणि इतर असे एकूण जवळपास अडीचशे लेख प्रकाशित झाले आहेत. विविध स्थानिक व राज्यस्तरीय वृत्तपत्रांमधून त्यांनी विपुल लेखनही केले आहे. 

प्रकाशित पुस्तके 
डॉ. प्रभाकर चौधरी यांनी प्रामुख्याने बालसाहित्य समृद्ध केले आहे. कथापुष्प, महात्मा गांधी कथामाला, आधुनिक नितीकथा आशा काही पुस्तकांचे एकापेक्षा जास्त भाग प्रकाशित केले असून त्यांच्या एकूण पुस्तकांची संख्या 80पेक्षा जास्त आहेत. चंद्रास्त, शिक्षण समाज व शिक्षण, उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण, विचारपुष्पे, कथापुष्प, महात्मा गांधी कथामाला, प्रार्थना आणि प्रार्थनाविचार, साने गुरुजींचे विचारवैभाव यासारखी पुस्तके त्यांनी लिहिली. 
Teaching of English (Commutative Approach), सर्वपल्ली राधाकृष्णन : व्यक्तित्व आणि विचार, मुखी अमृताची वाणी, प्रकाशयात्रा, प्रकाशकण, संत आणि सुधारक, बहिणाबाई चौधरींची कहाणी यासह अन्य पुस्तकांची मालिकाही यात आहे.