esakal | एमपीडीए कारवाईपूर्वीच अट्टल गुन्हेगार पोलिस स्टेशनमधून पळाला
sakal

बोलून बातमी शोधा

एमपीडीए कारवाईपूर्वीच अट्टल गुन्हेगार पोलिस स्टेशनमधून पळाला

एमपीडीए कारवाईपूर्वीच अट्टल गुन्हेगार पोलिस स्टेशनमधून पळाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः पिस्तुलाच्या जोरावर गुन्हे करण्यात तरबेज अट्टल गुन्हेगार (Criminal) राकेश चंद्रकांत साळुंखे ऊर्फ लिंबुराक्या यास शनिपेठ पोलिसांनी (Police) गेल्या आठवड्यात पिस्तुलासह अटक केली होती. पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत असताना नुकताच त्याचा जामीन झाला असून, प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्यास शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र त्याने बुधवारी (ता. २२) पोलिस ठाण्यातूनच (Shanipeth Police Station) पळ काढला.

हेही वाचा: ‘एटीएम’ने अनेकांची लावली लाॅटरी,आनंदात पार्टी मग पोलिसांची धास्ती


राकेश ऊर्फ लिंबुराक्या चंद्रकांत साळुंखे (वय २६, रा. कांचननगर) याला शनिपेठ पोलिसांनी १६ सप्टेंबरला शनिपेठ सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले होते. त्याच्या ताब्यातून पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात अटकेनंतर लिंबुराक्याची कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. नुकताच त्याच्या वतीने जामीन अर्ज सादर होऊन दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर त्याची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. जामीन मंजूर झाल्यावर त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बुधवारी शनिपेठ पेठ पोलिसांनी पकडून पोलिस ठाण्यात आणले होते. क्राइम रायटर त्याच्यावरील कारवाईची कागदपत्रे तयार करत असतानाच त्याने अलगदरीत्या पोलिस ठाण्यातून पळ काढला. संशयित पोलिस ठाण्यातून पळून गेल्याने त्याला घेऊन येणारे कर्मचारीही गप्प आणि कारवाई करणारे गप्प राहिले. मात्र पळून गेल्याचा बोभाटा होऊन चौकशी केली असता त्याला पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. नंतर आम्हीच जाऊ दिल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: शिरपूर पोलिस ठाण्याबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न


एमपीडीएच्या भीतीने ठोकली धूम
लिंबुराक्याला जामीन मंजूर झाल्यावर कारागृहातून बाहेर पडताच प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, तत्पूर्वीच त्याला कारवाईची भनक लागली होती. वर्षभरासाठी एमपीडीएची कारवाई करणार असल्याचे त्याला सांगण्यात आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर प्रतिबंधात्मक कारवाईपूर्वीच त्याने भिंती ओलांडून पळ काढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top