esakal | स्थायी समितीच्या सभेत खड्डेमय रस्त्यावरून शिवसेना आक्रमक 
sakal

बोलून बातमी शोधा

स्थायी समितीच्या सभेत खड्डेमय रस्त्यावरून शिवसेना आक्रमक 

रस्ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त खराब असून, त्या तोकडी व्यवस्थेतून रस्ते दुरुस्त केले, तर ठिगळ लावल्यासारखे होईल.

स्थायी समितीच्या सभेत खड्डेमय रस्त्यावरून शिवसेना आक्रमक 

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव  : शहरात पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती केलेले रस्ते पुन्हा खड्डेमय झाले आहेत. खड्डे बुजविण्याचे काम व्यवस्थित न केल्याने झालेला खर्च पाण्यात गेला, असा आरोप शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा, नितीन बरडे यांनी केला. नव्याने रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करून कामाच्या गुणवत्तेवर लक्ष द्यावे, अशा सूचनाही स्थायी समितीपुढे शिवसेना सदस्यांनी मांडल्या. १९ विषयांना मंजुरी देण्यात आली. 

स्थायी समितीची सभा बुधवारी (ता. २५) सकाळी अकराला शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली. सभेत रस्त्यांवररील खड्डे, शिवाजीनगर पूल, कोंडवाडा व कोविड सेंटरची स्वच्छता व जेवणा पुरविणारा मक्तेदारावर जोरदार चर्चा झाली. 

खराब रस्त्यावरून प्रशासनाला घेरले 
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक व नगरसेवक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी व्यवस्था तोकडी आहे. रस्ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त खराब असून, त्या तोकडी व्यवस्थेतून रस्ते दुरुस्त केले, तर ठिगळ लावल्यासारखे होईल, असा आरोप शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी केला. सभापती हाडा यांनी प्रशासनाने वाढीव प्रस्ताव सभेपुढे ठेवावा, अशी सूचना दिली. 


शिवाजीनगर उड्डाणपूल कधी होणार 
मागील दोन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका यांच्यात समन्वय नसल्याने या पुलाचे कामसंथ गतीने सुरू आहे. शिवाजीनगरातील नागरिक जीव मुठीत घेऊन तहसील कार्यालयाशेजारील रेल्वे रुळ ओलांडत आहे. त्यामुळे महापालिकेने पूल लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सदस्यांनी स्थायीत केली. आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागासोबत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. 

कोडवाड्याचा निविदेवर सत्ताधाऱयांचा आक्षेप 
कोंडवाडा संदर्भात प्रशासनाने राबविलेली निविदा प्रक्रीया ही योग्य नसल्याचा आक्षेप सत्ताधारी नगरसेवकांनी घेतला. सत्ताधाऱ्यांची ही भूमिका संयुक्तीक नसल्याचा आरोप लढ्ढा यांनी केला. तर विषयांवर तांत्रिक अडचण आल्याने तो पुन्हा महासभेकडे पाठविला आहे असे स्थायी सभापतींनी सांगितले. 

प्रशासनाच्या कामकाजेत सदस्यांची नाराजी 
प्रभागातील कामंबाबत नगरसेवकांना विश्‍वासात न घेणे तसेच तक्रारींकडे प्रशासन दुर्लक्ष करणे अशी नाराजी सभेत नगरसेवकांनी व्यक्त केली. यावर सभापती हाडा यांनी प्रशासनाने लोकप्रतिनिधींसी समन्वय ठेवून काम करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. 
 

loading image
go to top