पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे जळगावच्या मदतीला; पाच ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा शासकीय रुग्णालयात हे पाच ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर जिल्हाधिकारी अभिजित राऊत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

जळगाव : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असून, बाधित रूग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मदतीला धावून आले. जळगाव जिल्ह्यासाठी पाच ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर यंत्र उपलब्ध करून दिले आहेत. 

आवर्जून वाचा - अबब... जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 23 हजार रुग्ण वाढणार 

शहरासह जिल्ह्यातील नागरिकांसाठी शिवसेना व युवासेना मदतीसाठी धावून आले असून शिवसेनेचे उपनेते व पाणी पुरवठामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यातून शिवसेना नेते तथा पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यासाठी पाच ऑक्‍सीजन कॉन्संट्रेटर यंत्र उपलब्ध करून दिले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा शासकीय रुग्णालयात हे पाच ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर जिल्हाधिकारी अभिजित राऊत व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सदर ऑक्‍सीजनचे यंत्र हे जळगाव, भुसावळ या कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. यावेळी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे जिल्हावासीयांतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले. 

पन्नास रूग्णांना मिळणार लाभ 
कोरोना पॉझिटीव्ह असलेले रूग्णांला एखाद्यावेळी ऑक्‍सिजनची आवश्‍यकता पडत असते. बहुतांश वेळी ऑक्‍सिजन न मिळाल्यास मृत्यू होण्याची शक्‍यता आहे. परंतु एका ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर मशीनमुळे एकाच वेळी 10 रुग्णांना ऑक्‍सीजन उपलब्ध होतो. पाच यंत्रांमुळे एकाच वेळी 50 रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shiv sena minister aaditya thakrey five oxigen consetet machine