शिवसेनेचे अनोखे आंदोलन; साचलेल्या पाण्यात कागदी बोटी सोडून सत्ताधारी भाजपचा निषेध  

कैलास शिंदे
Monday, 14 December 2020

महापालिकेने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी करण्यात आली आहे. जर लवकर या सांडपाण्याचा निचराकेला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशााराही देण्यात आला आहे.

जळगाव : शहरातील गोलाणी व्यापारी संकूल परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून सांडपाणी साचले आहे, अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका त्याबाबत लक्ष देत नसल्यामुळे शिवसेनेतर्फे याच सांडपाण्यात कागदी बोटी तसेच जीवंत मासे सोडून अनोखे आंदोलन करण्यात आले. 

 आवश्य वाचा- मोलमजुरी करणाऱ्या गरीब युवकांचे असे ही श्रीमंत मन !
 

महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मात्र सत्ताधारी लक्ष देत नसल्यामुळे अधिकारीही काम करीत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. असा आरोप विरोधी शिवसेनेतर्फे होत आहे. गोलाणी संकुल परिसरातील तळ मजल्यावर गेल्या अनेक वर्षापासून सांडपाणी साचले आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना मच्छरांचा तसेच अस्वच्छ पाण्याचा त्रास होत आहे. या सांडपाण्याची त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे केली आहे. याशिवाय सत्ताधारी

पदाधिकाऱ्यांनाही त्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्यापही त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी या सांडपाण्यात कागदी बोटी सोडल्या तसेच जीवंत मासेही सोडून अनोखा निषेध केला. महापालिकेने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी करण्यात आली आहे. जर लवकर या सांडपाण्याचा निचराकेला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशााराही देण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक विष्णू भंगाळे, शिवसेना महिला आघाडीच्या मंगला बारी आदी यावेळी उपस्तित होते. 

 वाचा- ..अन् बाराशे रुपयांत ‘आयजी’ 

याबाबत नगरसेवक सुनील महाजन म्हणाले, कि शहरातील नागरिकांना अनेक समस्यांशी सामना करावा लागत आहे. मात्र महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी त्यांच्याकडे लक्ष न देता वाताणुकूलीत दालनात बसून असतात. महापालिकेने याकडे त्वरीत लक्ष दिले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही त्यांनी दिला आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Shiv Sena protested against the ruling BJP in the municipal corporation through agitation