भाजपने आमचा विश्‍वासघात केला यामुळेच बाहेर पडलो-डॉ.निलम गोऱ्हे

मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam Gorhe Dr. Neelam Gorhe
Summary

एकमेकांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी कोणाशी भेटावे हा ज्यांचा त्यांचा प्रश्‍न आहे. राजकारणात केव्हाही काहीही होवू शकते.

जळगाव ः राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू किंवा मित्रनसतो. राजकारणात मतभेद असू शकतात. जेव्हा आमचा त्यांनी (भाजपने) विश्‍वासघात केला जेव्हा समजले तेव्हा आम्ही युतीतून बाहेर पडलो. अन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) असे साथीदार निवडले. राज्यात आमचे यशस्वी स्थिर सरकार आहे. त्यांच्याशी (भाजप) मतभेद झाल्यानंतर त्यांनी कोणासोबत जावे हा त्यांचा प्रश्‍न आहे. कोल्हापूरला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांचीही भेट झाली होती. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या, आणि आता पुन्हा केव्हा या दोघांची भेट होणार असे प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यांना फडणवीस यांनाच विचारा असे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Deputy Speaker of the Legislative Council Dr. Neelam Gorhe) यांनी आज येथे दिली.

 Dr. Neelam Gorhe
चक्क..आई वडीलांचेच स्मृती मंदिर बनवले शेतात!

आज मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दूपारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्या बोलत होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, शरद तायडे उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, एकमेकांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी कोणाशी भेटावे हा ज्यांचा त्यांचा प्रश्‍न आहे. राजकारणात केव्हाही काहीही होवू शकते. आम्ही त्यांच्या पासून लांब आहोत. मतभेद आहेत. राज्यात सत्ता आल्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याशी आम्ही सुडबुध्दीने वागलो नाही.

केंद्राने लसीचा पुरवठा केला नाही
केंद्र शासनाने अगोदर लसींची खरेदी केंद्र स्तरावर करण्याची जाहीर केले. नंतर राज्यांनी लस खरेदी करावी असे सांगितले. एकदा एक विधान दुसऱ्या वेळी दुसरेच यामुळे लसीकरणाचा वेग राज्यात मंदावला. जर अगोदरच केंद्राने लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा झाला असता तर दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला नसता.

 Dr. Neelam Gorhe
सलग चौदा दिवस मृत्यूशी झुंज;आणि 'मोहन' चालत गेला घरी

शिवसंपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला असून जिल्ह्यात शिवसेनेची चांगले संघटन होत आहे. आता शिवसेनेत ग्रामीण भागातील महिलाही सहभागी होवू लागल्या आहेत. आंदोलनाची परिभाषा आता बदलली असून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा कागदोपत्री पाठपूरावा करणे हेही एक आंदोलनच असते ते शिवसेना करीत आहे. महिला आरक्षणामागील भुमिका अशी आहे की आरक्षीत जागेवरील महिला कार्यशीत व गुणवत्ताधारक असायला हवी.
कोरोनामुळे पालक गमाविलेल्यांना आगामी दोन महिन्यात मदत मिळेल. सध्या पालक गमाविलेल्या बालकांचा शोध घेणे, त्यांची कागदपत्र जमा करणे त्यांना इतर मदत करणे आदी कामे सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com