
जळगाव ः हाथरस (उत्तरप्रदेश) येथील सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे देशभरात सर्वस्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आवश्य वाचा- मुलाची केक कापण्याची तयारी; इतक्यात सिलेंडरचा भडका
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित समाजातील एका युवतीवर काही नराधमांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. अतिशय संतापजनक असणाऱ्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, देशभरात संतप्त पडसाद उमटले आहेत. या घटनेचा जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, या घटनेतील पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळायला हवा. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, उत्तर प्रदेशातील परिस्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या.
आंदोलानात यांचा होता सहभाग
आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्तीचे विराज कावडिया, अमित जगताप, महिला महानगरप्रमुख ज्योती शिवदे, मनीषा पाटील, उषा जाधव, कविता पाटील, पद्मजा चोरडिया, भारती सोनवणे, वंदना कापसे, वर्षा सपकाळे आदींनी सहभाग नोंदवला.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.