esakal | वहन न फिरता जळगावचा रथोत्सवाला सुरवात, भाविकांनी ऑनलाईन घेतले दर्शन 
sakal

बोलून बातमी शोधा

वहन न फिरता जळगावचा रथोत्सवाला सुरवात, भाविकांनी ऑनलाईन घेतले दर्शन 

श्रीरामाची आरती तसेच वहनाची आरती करून रथोत्सवाला प्रारंभ झाला, अकरा वहन निघत असून बाराव्या दिवशी श्रीरामाचे रथ निघतो. यंदा मंदिरा भोवतीचा परिसर पाउण किलो मिटरच्या परिसरतात वहन फिरणार आहे.

वहन न फिरता जळगावचा रथोत्सवाला सुरवात, भाविकांनी ऑनलाईन घेतले दर्शन 

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव  ः येथील जुने जळगाव परिसरातील श्रीराम मंदिर व रथोत्सव समितीतर्फे दरवषी कार्तिकी एकदशीला रथोत्सव काढण्याची १५० वर्षाची परंपरा आहे. यंदा कोरोना संसर्गामुळे रथोत्सव साजरा हा गावात रथ न फिरताच सुरवात झाली. आज रथ चौकातील श्रीराम मंदिरात रथ व वहनाची पुजा करून सुरवात झाली. तर भाविकांनी ऑनलाईन या रथोउत्सवाचे दर्शन घेतले.

आवश्य वाचा- काय सांगतात ! चक्क आमदारांनाच भाजी खरेदीसाठी जावे लागले बाजारात

कोरोना संसर्गामुळे रथोत्सव काढता येणार नसल्याने श्रीराम मंदिराभोवतीच रथ फिरवून रथोत्सव यंदा प्रथमच होणार आहे.श्रीराम रथोत्सवाला दिडशे वर्षाची परंपरा असून जळगावकरांचे श्रीराम रथोत्सव हे मोठे श्रध्देचे स्थान आहे. दिवाळीच्या पाडव्या पासून वहनोत्सवाला सुरवात होतो.

अश्व वहनाने रथोत्सवाला सुरवात

आज सायंकाळी श्रीराम मंदिरात रथोत्सवाचे पुजन दादा महाराज जोशी यांच्या हस्ते श्रीरामाची आरती तसेच वहनाची आरती करून रथोत्सवाला प्रारंभ झाला, अकरा वहन निघत असून बाराव्या दिवशी श्रीरामाचे रथ निघतो. यंदा मंदिरा भोवतीचा परिसर पाउण किलो मिटरच्या परिसरतात वहन फिरणार आहे. 

वाचा- प्रसिध्द सराफ व्यवसायीक रतनलालजी बाफना यांचे निधन -

अनेक भाविकांनी घेतले ऑनलाईन दर्शन 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथोत्सवात गर्दी टाळण्यासाठी भाविकांना बारा ही दिवस श्रीराम मंदिराकडून ऑनलाईन पध्दतीने, श्रीराम मंदिर फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन दर्शन घेतले.