कपाशीला यंदा ६५०० चा भाव शक्य:७० लाख गाठींचे उत्पादन अपेक्षीत

Jalgaon Cotton News : खासगी व्यापारी अधिक भाव देण्यास कारणही तसेच आहे. चीन, बांग्लादेशात महाराष्ट्रातील कपाशीला प्रचंड मागणी आहे.
cotton
cotton

जळगाव ः जळगाव जिल्ह्यात अस्सल सोने म्हणून कपाशी (Cotton) उत्पादनाकडे पाहिले जाते. यामुळे अधिकाधिक शेतकरी कपाशीचे उत्पादन घेतात. अनेक वेळा वादळ, अतिवृष्टीचा फटका कपाशीला (Heavy Rain) बसतो. यंदाही तो बसला आहे. याचा परिणाम कपाशीचे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन येईल. परिणामी बाजारात (Market) कपाशीची आवक कमी असल्यास खासगी व्यापारी ६५०० ते ७००० हजार रुपये प्रतिक्विटंल भाव (Price) देतील, असे आशादायक चित्र सध्या आहे.

cotton
अजिंठा लेणीच्या धबधब्यात पडलेल्या तरुणांला वाचवण्यात यश


मेत पेरलेल्या बी. टी. कापूस गेल्या आठवड्यापासून बाजारात येऊ लागला आहे. त्याला काही ठिकाणी ८ ते ९ हजार प्रतिक्विटंलचा भाव व्यापाऱ्यांनी दिला. मात्र हा भाव अतिशय कमी प्रमाणात विक्रीस आलेल्या कपाशीला होता. एक ते अकरा क्विंटल ज्यांनी कपाशी विक्रीस आणली होती. त्यांना हा भाव मिळाला. गतवर्षी बाजारात कपाशी बाजारात येण्याच्या काळात ४५०० ते ५ हजारांचा दर व्यापाऱ्यांनी दिला होता. यंदा, मात्र शेतकऱ्यांचा ६५०० ते ७ हजारांपर्यंत चांगल्या कापसाला भाव राहील.


चीन, बांग्लादेशात मागणी

खासगी व्यापारी अधिक भाव देण्यास कारणही तसेच आहे. चीन, बांग्लादेशात महाराष्ट्रातील कपाशीला प्रचंड मागणी आहे. सोबतच कपाशीतून सूत चांगले निघते, सरकीला चांगला भाव आहे. महाराष्ट्रातही यंदा अनेक ‘टेक्सटाईल पार्क’ सुरू झाल्याने त्यातही कपाशीला मागणी राहील. मागणी वाढली की कपाशीला भाव येतो.

cotton
जळगाव तालुक्यातील केळी इराण ला रवाना


१ ऑक्टोबरला कापूस बाजारात

सध्या पावसाळी वातावरण आहे. अनेकांचा कापूस निघाला मात्र त्यात ओल आहे. पावसाचे दिवसही आहेत. पितृपक्षात कडक उन्हामुळे कपाशीतील ओल कमी होऊन आगामी पंधरा दिवसात १ ऑक्टोबरपर्यंत बाजारात नवीन कापूस अधिक प्रमाणात येईल. नवरात्रोत्सव, विजयादशमीला अनेक शेतकरी कापूस विकतील. महाराष्ट्रात ७० ते ७५ हजार कपाशीच्या गाठी यंदा तयार होतील. भारतात ३ कोटी ५० लाख गाठी तयार होतील असा अंदाज आहे.

cotton
मेडिकल टेस्टचा घोळ;धुळ्यात डेंगीमुळे निष्पाप बालकाचा बळी


चांगला पावसामुळे कपाशीचे नुकसान झाले असले तरी येणाऱ्या कपाशीला चांगला भाव असेल. विजया दशमीला नवीन कापूस येण्याची शक्यता असून साधारणतः साडेसहा हजार ते सात हजारांचा दर व्यापारी चांगल्या कापसाला देतील. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठेत कपाशीला मागणी असेल.
-प्रदीप जैन, अध्यक्ष
खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com