esakal | जळगाव जिल्ह्यात रब्बिचे ६५ हजार हेक्टरवर पेरण्या 
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात रब्बिचे ६५ हजार हेक्टरवर पेरण्या 

यंदा १२९ टक्के पाऊस झाला. सर्वत्र धरणे भरली आहेत. मात्र पिके ऐन हातातोंडाशी आल्यानंतर अतिवृष्टीने कापसासह इतर पिकांचे नुकसान झाले. जो कापूस आला तो मोठ्या प्रमाणात बागायती आहे.

जळगाव जिल्ह्यात रब्बिचे ६५ हजार हेक्टरवर पेरण्या 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात नोव्हेंबरच्या सुरवातीला थंडी जोरदार होती. मात्र दिवाळीनंतर थंडी बेपत्ता झाली आहे. रब्बीच्या पेरण्यांनी वेग घेतला असून, आतापर्यंत ६५ हजार हेक्टरवर पेरण्या (३४ टक्के) पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा असणार आहे. 

वाचा- निशाणे जवळ दोन मोटार सायकलला अज्ञात वाहनाची धडक; तीन ठार तीन जखमी -

हवामान विभागाच्या अंदाजानुसार लवकरच पुन्हा थंडीचा जोर वाढणार आहे. यामुळे उर्वरित ६६ टक्के पेरण्या पूर्ण होणार आहेत. यंदाही गव्हाचे सर्वाधिक उत्पादन होणार आहे. सुमारे दोन हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्यांचे उद्दिष्ट कृषी विभागाचे आहे. 

यंदा खरिपात १२९ टक्के पाऊस झाला. सर्वत्र धरणे भरली आहेत. मात्र पिके ऐन हातातोंडाशी आल्यानंतर अतिवृष्टीने कापसासह इतर पिकांचे नुकसान झाले. जो कापूस आला तो मोठ्या प्रमाणात बागायती आहे. अतिपावसामुळे कपाशीची बोंडे काळी पडली. काही ठिकाणी कपाशीवर बोंडअळी आली. शेतकऱ्यांनी फवारणी करून, फेरोमन सापळे लावून बोंडअळीला अटकावाचा प्रयत्न केला. मात्र शेवटचा बहर असल्याने अनेकांनी कपाशी उपटून फेकली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 
आता रब्बीचा हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा, गव्हाची पेरणी सुरू केली आहे. थंडी कमी झाल्याने पेरण्यांचा वेग कमी झाला तरी आगामी काळात थंडी वाढून पेरण्यांना वेग येईल. सर्वाधिक पेरा हरभरा, गव्हाचा राहणार आहे.

 वाचा- सोमवारपासून शाळांची घंटा वाजणार ; ९ ते १२ वीचे वर्ग सुरू करणार

यंदा अपेक्षित पेरणी लक्ष्यांक असा 
पीक--हेक्टर/क्षेत्र 
ज्वारी-२१ हजार ५०० 
गहू--२७ हजार 
मका--२५ हजार 
हरभरा--५० हजार 
इतर--३०० हेक्टर 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image