‘रईस जाद्यांचा’ उच्छाद; सुसाट जीप कोसळली थेट तलावात

जीप तलावात कोसळल्याने बघणाऱ्यांचा काळजाचा ठोकाच चुकला.
ACCIDENT
ACCIDENTACCIDENT


जळगाव: शहरातील मेहरुण तलाव (Mehrun Lake) परिसरात एका बाजुला चोर भामटे आणि लूटारुंची भिती तर, दुसऱ्या बाजुला चौपाटीच्या दिशेने लव्ह बर्डस्‌ चा उपद्रव त्यातही आता सुसाट बाईक रायडर्स आणि चारचाकी वाहनांना ‘रेसींग स्टाईल’ (Racing style) पळवणाऱ्यांनी भितीचे वातावरण निर्माण केले आहे. रविवारी संध्याकाळी ‘मॉडीफाईड’ सुसाट जीप (Jip) गाडी तलावात कोसळल्याची घटना घडली. कार तलावात (Lake) कोसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली, फोटोही आले मात्र, पोलिस (jalgaon police) तलावा पर्यंत पोहचण्यापूर्वी संबधीतांनी वाहन बाहेर काढून पळ काढला. परिणामी या प्रकरणी कुठलीच कारवाई होऊ शकली नाही.
( speeding jeep fell into jalgaon meheun lake )

ACCIDENT
जळगावातील वैभवप्राप्त चटई उद्योग अडचणीत

पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली असून सर्वत्र अल्हाद दायक वातावरण आहे, त्यात रविवार सुटीचा दिवस काळ्याशार ढगांनी भरलेले आभाळ असे रोमांचीत करणारी संध्याकाळ असल्याने श्रीमंतांच्या कुटूंबातील बिगडे नवाब रईसजाद्यांनी दंगामस्ती करतच रपेटचा बेत आखला. त्यात मॉडीफाईड केलेली फोरबाय फोर ( फोरव्हिल ड्राईव्ह) अशी शक्तीशाली जीप कार घेवून मित्रांसह काही तरुण मेहरुण चौपाटीवर अवतरले. इकडून-तिकडे बऱ्याच आडव्या उभ्या फेऱ्या मारत ही मंडळी बऱ्यापैकी एन्जॉय (दंगा-मस्ती) करत होती. त्यातच पावसाच्या सरी कोसळल्याने अधीक वेगात इकडून तिकडे गाडी पळवणे आणि त्यात फोटोशेसन सुरु असल्याने सुसाट जीप चक्क मेहरुण तलावात कोसळली. चालकासह त्याच्या सोबतच्या मित्रांना किरकोळ दुखापत झाल्याने तेही काही काळ भेदरले. काही गाडी सेाडून पळून गेले. थोड्यावेळाने येवुन यापैकी काहींनी तलावात पडलेली जीप काढून पोबारा केल्याचे घटनास्थळी पेाहचलेल्या पोलिसांना उपस्थीतीांनी माहिती दिली.

ACCIDENT
जळगाव जिल्ह्यात आजपासून निर्बंधांत वाढ!

अन्‌ काळजाचा ठोकाच चुकला
रविवारचा दिवस असल्याने परिसरातील काही जोडपी, लहान मुलांसह तलावाकाठी आलेली होती. याच वेळेस या जीप चालकांचे कर्तबही लोक बघत होते. अचानक काठावून हि जीप तलावात कोसळल्याने बघणाऱ्यांचा काळजाचा ठोकाच चुकला. काहींनी आरोळ्या मारल्या तर, काहींनी मदतीला धाव घेतली. एकदोन जणांनी पाण्यात कोसळलेल्या जीपचे फोटो काढून ते, पोलिसांना सेंड केल्याने पोलिस घटनास्थळी धडकले. सुदैवाने यात कोणासही गंभीर दुखापत झाली नाही, किंवा जिव गेला नाही. परंतु अशा ‘रईसजाद्यांचा’ पेालिसांनी वेळीच इलाज करावा अशी मागणी चौपाटीवर आलेल्या सुज्ञ नांगरीकांतर्फे करण्यात येत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com