पहिल्‍या लग्‍नाचा राज उघडतो तेव्हा..

रईस शेख
Thursday, 26 November 2020

लग्नानंतर प्रवीणच्या किडन्या निकामी झाल्याने लग्नात मिळालेले सोने काढून घेत सासरच्या मंडळींनी माहेरी हकलून दिले होते. पिडीतेने रामानंदनगर पेालिसांत तक्रार दिल्यावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव : शहरातील मोहाडी रेाड येथील २७ वर्षीय तरुणीचा अहमदाबाद येथील प्रविण गिरधर चोपडे याच्या सोबत विवाह झाला होता. अगोदरच श्रीलंकेतील तरुणी सेाबत विवाह बंधनात असतांना प्रवीण व त्याच्या कुटूंबीयांनी हि बाब लपवुन जळगावच्या मानसी चंद्रकांत पाटिल या तरुणीची फसवणुक केली.

शहरातील मोहाडीरोड चंद्रमोहन अपार्टमेंट येथील मानसी चंद्रकांत पाटील(वय २७) या तरुणीचे अहमदाबाद (गुजरात) येथील प्रवीण गिरधर चोपडे याच्यासोबत १२ ऑक्टोबर २०१७ रोजी लग्न झाले होते. लग्नात कुटूंबीयांनी अडीच लाख हुंडा, वीस तोळे सेान्याचे दागिने आणि लग्नाचा खर्च असे करुन मुलीच्या वडीलांनी लग्न लावून दिले. 

असा उघडला पहिल्‍या लग्‍नाचा राज
लग्नानंतर प्रवीण चोपडे याच्यासोबत अहमदाबाद येथे राहिल्यानंतर पंधराच दिवसानंतर कामानिमीत्त अमेरीका जात असल्याचे सांगत पत्नीला सेाडून निघुन गेला. नंतर, मानसीला घरात सापडलेल्या कोर्टाच्या कागदांवरुन कळाले की..प्रवीणचे श्रीलंका येथील दिमतु विजय शेखरा या तरुणीसेाबत लग्न झाले असून घटस्फोटाचा वाद सुरु आहे. 

माहेरी दिले पाठवुन 
अशातच प्रवीण चोपडे याला पेाटात दुखू लागल्याने तपासण्या केल्या. त्याच्या देान्ही किडण्या निकामी झाल्याचे निदान झाले. किडनी प्रत्यार्पणासाठी पत्नी मानसीची किडनी कुटूंबीयांनी मागीतली. किडनी प्रत्यार्पणानंतर आपण सोबत राहु असे प्रवीण सांगत होता. मात्र, मुलीच्या आई-वडीलांनी अगोदर मुलाच्या कुटूंबातील किडणी शोधण्याचा आग्रह धरल्याने सासरच्या मंडळींनी लग्नात मिळालेले सेाने काढून घेत माहेरी पाठवून दिले. काही दिवसांनी प्रवीणच्या वडीलांनी दिलेली किडनी प्रत्यार्पीत झाली व त्याची प्रकृती ठिक असतांनाही सासरची मंडळी वागवत नसल्याने मानसीच्या तक्रारीवरुन पती-प्रवीण गिरधर चोपडे, सासरे- गिरधर दामोदर चोपडे, सासू-अलका गिरधर चोपडे अशांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon srilankan lady first wife and another marriage