esakal | रात्रीचे खड्डे दिसण्यासाठी जळगावच्या रस्त्यांवर ‘एलईडी’चा प्रकाश 
sakal

बोलून बातमी शोधा

रात्रीचे खड्डे दिसण्यासाठी जळगावच्या रस्त्यांवर ‘एलईडी’चा प्रकाश 

मोहाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून एलईडी दिवे बसविण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.

रात्रीचे खड्डे दिसण्यासाठी जळगावच्या रस्त्यांवर ‘एलईडी’चा प्रकाश 

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव :  जळगाव शहरात सर्वच रस्ते खड्डेमय असून रात्री तर वाहन चालकांना या खड्डेमय रस्त्यांवर तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात गेल्या दिड-दोन वर्षापासून एलईडी पथदिवे बसविण्याचे काम चालु-बंद सुरू आहे. त्यात आता पून्हा शहरात सध्या असलेले पथदिवे काढून एलईडी बसविण्याच्या कामाला मंगळवारी पुन्हा सुरवात झाल्याने एलईडी पथदिव्यांनी हे खड्डेमय रस्ते प्रकाशमय होणार आहे. 

आवश्य वाचा- ‘अमृत’चे त्रांगडे..चारशे कोटींच्या योजनांचे काम ‘रामभरोसे’ 
 

गेल्या दिड वर्षापूवी शहरात एलईडी बसविण्यास सुरवात करण्यात आली होती. शहराच्या काही भागात एलईडी बसविल्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे काम बंद झाले होते.  या कामाला मंगळवारी पुन्हा कामाला मोहाडी रस्त्यावर महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते पूजा करून नारळ वाढवून कामाला सुरवात करण्यात आली. या वेळी उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, सदाशिव ढेकळे, नगरसेवक कैलास सोनवणे, ज्योती चव्हाण, मनोज आहुजा, जितेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, आशुतोष पाटील आदी उपस्थित होते. 

मोहाडी रस्त्यापासून सुरवात 
मोहाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून एलईडी दिवे बसविण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे.

आवर्जून वाचा- सात महिन्यानंतर सिव्हील ओपीडीचे दार खुले; कोरोनामुळे सेवा होती बंद
 

खड्डेमय रस्ते प्रकाशाने उजणार

शहरातील संपूर्ण रस्ते खड्डेमय झाले आहे. त्यान नविन वसाहतीमध्ये अजून देखील पथदिवे नसल्याने नागरिकांना खड्ड्मेय रस्ते, कच्चे रस्ते अंधारात जीव मुठीत घेवून घरी जावे लागत आहे. आता मात्र एलईडी पथदिवे बसविण्याचे काम पून्हा सुरू झाल्याने खड्डेमय रस्ते एलईडीच्या प्रकाशाने उजळणार आहे.

loading image