आजचा विधान परिषदेचा निकाल ही तर ट्रायल मॅच

राजेश सोनवणे
Friday, 4 December 2020

शेतकऱ्यांशी भिडतो त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. देशभरातील शेतकरी जंतरमंतरवर मंतर मारल्याशिवाय राहणार नसल्‍याचे देखील ते म्‍हणाले.

जळगाव : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यश मिळाले. या निकालानंतर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. या निवडणूकीतील निकालामुळे स्‍पष्‍ट होतेय की सरकार चांगले काम करत आहे. ही तर ट्रायल मॅच होती? पुढे आणखी काय होते ते पहाच; असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी काढला आहे.

राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्‍यानंतर राज्य पातळीवर प्रथमच एकत्रित निवडणूक लढलो. त्यात आम्हाला घवघवीत यशही मिळाले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या जागीही आम्ही विजयी झालो आहोत. या निवडणुकीचा निकाल म्हणजे सरकार चांगले काम करत असल्याचे जनतेने दाखवून दिले आहे. अर्थात ही तर अजून ट्रायल मॅच आहे; पुढे पहा काय होते, असे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सांगितले. धुळे-नंदूरबार येथे अमरीश पटेल यांचा झालेला विजय हा भाजचा विजय नाही. पटेल हे त्यांच्या कामामुळे निवडून आलेले आहेत, असंही ते म्हणाले. राज्यातील सरकार तीन चाकी नाही, तर हे चारचाकी सरकार आहे. हे चौथे चाक जनतेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. जो शेतकऱ्यांशी भिडतो त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. देशभरातील शेतकरी जंतरमंतरवर मंतर मारल्याशिवाय राहणार नसल्‍याचे देखील ते म्‍हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon statement gulabrao patil vidhan parishad result