तलाठी आप्पाची रेकॉर्डींग झाली व्हायरल; आणि त्‍यांची ततफफ.. 

रईस शेख
Thursday, 3 December 2020

तलाठी अप्पा राजेंद्र घुले याला माहितीअधीकार कार्यकर्ता दिपक गुप्ता यांनी मोबाईल फोनवर संपर्क केला. काल घउलेला प्रकार सांगीतला..बंडाळेंना बरे नसल्याने ते उतरले, तुम्ही कारवाईला निघाले, अव्हाणे जवळ वाहन अडवले, चर्चा केली..सेाडून दिले.

जळगाव : जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतः जबबादारी अंगावर घेतली आहे. पोलिसदल आणि महसुल यांच्या संयुक्त विद्यमाने गिरणेतून गौण खनिज लूटणाऱ्या माफींयावर कारवाई करण्यात येत आहे. महसुल व पोलिस यंत्रणेचे पथक त्यासाठी नियुक्त करण्यात आले असुन याच पथकातील पोलिस व तलाठ्याने अव्हाणे रोडवर वाळू वाहतुक करणाऱ्या डंपरला सोडल्याचे प्रकरण समोर आले आहे. रविंद्र घुले असे या तलाठी अप्पाचे नाव आहे. 

जिल्‍हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये वाळूचा बेकायदा उपसा आणि वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाईचे निर्देष देण्यात आले असुन त्यासाठी प्रत्येक गावात विभाग निहाय अधीकारी कर्मचाऱ्यांच्या भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अगदी प्रांताधीकाऱ्यां पासुन ते तलाठ्या पर्यंत कोणताही अधिकारी नदीवर येवुन पहाणी करुन कारवाई करणार असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले होते. भाजपा नगरसेवक कुलभुषण पाटील याच्यासह त्याच्या साथीदारांवर संघटीत गुन्हेगारी केल्याचा गुन्हा दाखल झाला. प्रशासनाच्या कामगीरीचा एकिकडे गवगवा होत असतांना दुसरीकडे मात्र, ज्यांच्यावर कारवाईची जबाबबदारी आहे अशा पथकाकडूनच वाळूचे बेकायदेशीर उत्खनन करुन वाहतुक करणाऱ्या माफियांची वाहने सोडली जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे. 

अप्पाची ततफफ..रेकॉडींग व्हायरल 
तलाठी अप्पा राजेंद्र घुले याला माहितीअधीकार कार्यकर्ता दिपक गुप्ता यांनी मोबाईल फोनवर संपर्क केला. काल घउलेला प्रकार सांगीतला..बंडाळेंना बरे नसल्याने ते उतरले, तुम्ही कारवाईला निघाले, अव्हाणे जवळ वाहन अडवले, चर्चा केली..सेाडून दिले. सर्व ऐकून घेत तुम्ही कुठे आहे..मला भेटायचे आहे, भेटून बोलतो..असे घुले वांरवार म्हणत होते. गुप्ता आणि घुले यांच्यातील संभाषणाची रेकॉर्डींग व्हायरल झाल्याने कुंपणच शेत खात असल्याच्या प्रतिक्रीया सोशलमिडीयावर उमटत आहे. 

काय आहे प्रकरण 
तलाठी राजेंद्र घुले आणि बेंडाळे, पोलिस कर्मचारी सेानवणे आणि चालक असे मंगळवार(ता.१) रेाजी खासगी तवेरा कार क्रमांक (एमएच.१९.अेएक्स.८७८५)ने कारवाईसाठी बाहेर पडले होते. मांत्र, बेंडाळेची प्रकृती बरी नसल्याने त्यांना सेाडून गाडी कारवाईला निघाली. रात्रीचा अंधार अधीक दाट होतांनाच संध्याकाळी गिरणा नदिपात्रातून बेकायदेशीर उत्खनन करुन वाळूची वाहतुक करणारे डंम्पर क्र(एमएच.१९.सी.वाय.१४४७) याचे पाठलाग करुन अडवण्यात आले. तब्बल अर्धातास वाळूचोरट्या सेाबत चर्चेची खलबते चालल्या नंतर तलाठी अप्पा राजेंद्र घुले यांनी हे वाहन सोडून दिले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon talathi call recording viral in social media