esakal | आता तृतीयपंथीयांनी मिळणार ओळखपत्र; पोर्टल सुरू!
sakal

बोलून बातमी शोधा

आता तृतीयपंथीयांनी मिळणार ओळखपत्र; पोर्टल सुरू!

आता तृतीयपंथीयांनी मिळणार ओळखपत्र; पोर्टल सुरू!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी (transgender)ओळखपत्र (ID card) देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ओळखपत्रासाठी सामाजिक न्याय विभागाच्या (Department of Social Justice) संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी तथा तृतीय पंथीयांच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत (Collector Abhijeet Raut) यांनी दिली.

हेही वाचा: एफआरपी न मिळू देण्याचा पवारांचा कुटिल डाव-सदाभाऊ खोत

तृतीय पंथीयांच्या तक्रार निवारणासाठी गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, समितीचे सचिव योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा: प्रेम एकीशी अन्‌ विवाह दुसरीशी..आरोग्याधिकारी तरुणीची फसवणूक

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यावर तृतीयपंथीयांनी नाव नोंदणी करून आपले ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. तृतीयपंथीयांच्या समस्या जिल्हास्तरीय समितीकडे आल्यावर तत्काळ कार्यवाही करावी. या तक्रारी, समस्यांचे विहित कालावधीत निवारण करण्यात यावे. प्राप्त तक्रारींबाबत पडताळणी करून आवश्यकतेनुसार तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाकडे शिफारस करावी. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे. त्यांच्यासाठी लसीकरण शिबिराचे नियोजन करावे.
सदस्य सचिव पाटील यांनी समितीच्या कामकाजाची आणि विषय पत्रिकेची माहिती देऊन आतापर्यंत समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामकाजाचीही माहिती दिली.

loading image
go to top