शाळा सुरू विद्यार्थी कमी; अडीच लाखांपैकी २९ हजार विद्यार्थी उपस्थित 

देविदास वाणी
Wednesday, 9 December 2020

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शाळा निर्जंतुकीकरणाची कामे कालच पूर्ण झाली होती. पालकांनी संमती दिली तरच पाल्यांना शाळेत जाता येणार आहे.

जळगाव : कोरोना संसर्गाचा सामना करीत जिल्हा प्रशासनाने मंगळवार पासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या. मात्र आज भारत बंदमुळे अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविले नाही. काही शाळांमध्ये एका वर्गात तीनचे विद्यार्थी दिसून आले.  

आवश्य वाचा- बीएचआर घोटाळा: राज्यभरातील सात खटल्यांचे कामकाज जळगावात 

 

शाळेत आलेल्यांचे तापमान तपासणी, हॅन्ड सॅनिटयझेशन देऊन हात स्वच्छ करण्यास सांगण्यात आले. मास्क प्रत्येकाला लावणे सक्तीचे करण्यात आले. जिल्ह्यात नवीवी ते बारावीचे दोन लाख ३२ हजार ५८९ विद्याथी आहेत. त्यापैकी एकूण २९ हजार ५५२ विद्यार्थीच होते. 

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शाळा निर्जंतुकीकरणाची कामे कालच पूर्ण झाली होती. पालकांनी संमती दिली तरच पाल्यांना शाळेत जाता येणार आहे. ७२ हजार पालकांचे संमतिपत्रक शाळांना पात्र झाले आहे. त्यापैकीही २९ हजार ५५२ विद्याथी आल्याने शिक्षक जास्त अन् विद्यार्थी कमी, असे चित्र सर्वत्र पाहावयास मिळाले. १८८ शाळांनी शाळा सुरू करण्यास सहमती दर्शविलेली नाही. 

जिल्ह्यात मंगळवारपासून शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधित शाळांना तयारी करण्यास सांगितले आहे. शाळा सुरू करण्यासाठी तयारीची पाहणी गेल्या आठवड्यापासून शिक्षण विभागाचे अधिकारी विविध ठिकाणी भेटी देऊन करत आहेत. आतापर्यंत ८५६ पैकी ७५० शाळांची तपासणी झाली आहे. 

वाचा- कापुस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्यास कारवाई 
 

दृष्टिक्षेपात शाळांची स्थिती 
एकूण शाळा : ८६६ 
शाळा सुरू : ८२५ 
एकूण विद्यार्थी : दोन लाख ३२ हजार ५८९ 
आज हजर विद्यार्थी : २९ हजार ५५२ 
शिक्षक : नऊ हजार ६६७ 
संमतिपत्र दिलेले पालक : ७२ हजार 

तालुकानिहाय उपस्थित विद्यार्थी असे 
तालुका -- एकूण संख्या -- उपस्थित 

अमळनेर -- १६,३४९ -- २,४०७ 
भडगाव -- १०,६२६ ---- १,८७८ 
भुसावळ -- २१,४८६ -- १,२०८ 
बोदवड -- २,१९७ -- ५२८ 
चाळीसगाव -- २२,३४१ -- ३,९७१ 
चोपडा -- १६,४२१ -- २,८७४ 
धरणगाव -- ९,१५७ -- ९९५ 
एरंडोल -- ७,६८७ -- १,३४६ 
जळगाव -- ९,६७३ -- १,२६९ 
जळगाव मनपा शाळा -- २७,०३२ -- २,३८४ 
जामनेर -- १८,२५६ -- ३,०३३ 
मुक्ताईनगर -- ८,४७३ --९९७ 
पाचोरा -- १७,३६८ -- २,१६१ 
पारोळा -- १३,५५२ -- ७१७ 
रावेर -- १६,११२ -- १,७८१ 
यावल -- १५,८५९ -- २,००३ 
एकूण -- २,३२,५८९ -- २९,५५२ 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon thirty-one thousand out of two and a half million students attend schools