esakal | नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ! यावर भाजप आमदार म्हणाले, 'बात दूर तक जायेगी'

बोलून बातमी शोधा

rohini khadse-ram satpute
नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ! यावर भाजप आमदार म्हणाले, 'बात दूर तक जायेगी'
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे एकमेकांवर आरोप प्रतिआरोप सुरू आहे. त्यात आता खडसेंच्या कन्या आणि माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांच्यात ट्विटरवॉर रंगलेले पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत भाजप नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दीक युध्द रंगलेले आहे.

हेही वाचा: मनपा प्रशासन झोपेतच; ट्रेसिंग, टेस्टिंग विलगीकरणापर्यंतच मजल

एकनाथ खडसेंनी ‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशा शब्दात टीका केली होती. त्यावर बोलताना माळशिरसचे आमदार सातपुते यांनी “नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊबद्दल बोलतात. तसेच विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या गोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल” असं ट्वीट द्वारे सातपुतेंनी खडसेंना उत्तर दिले होते.

रोहिणी खडसेंचे घणाघाती उत्तर

आमदार सातपुते यांच्या ट्वीटला उत्तर देतांना खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी “अहो जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?” अशी घणाघाती टीका केली होती.

राम सातपुतेंनी पुन्हा टोला लगावला

रोहिणी खडसेंच्या ट्वीटला आमदार सातपुतेंनी पून्हा उत्तर देतांना म्हणाले, की “ताई भोसरी जमीन घोटाळ्यामुळे नाथाभाउंच मंत्रीपद गेलं. या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कारवाई झाली ना, यामुळेच तुमचा 2019 ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..? बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..!” असा ट्वीटद्वारे टोला लगावला.

mxh