जिल्ह्यात सर्व मॉल्स, कॉम्प्लेक्स अनलॉक; उद्यापासून अंमलबजावणी

देविदास वाणी
Tuesday, 4 August 2020

अपलॉकच्या या टप्प्यात सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असतील. रेल्वे, विमानसेवा, परजिल्हा बससेवा बंद राहतील. सर्व दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ अशी असेल.

जळगाव : शहरासह जिल्ह्यात उद्यापासून (ता.५) सर्व मॉल्स, शॉपींग कॉम्प्लेक्स अनलॉक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज घेतला आहे. अनलॉकबाबत नवीन नियमावलीचे आदेश काढण्यात आले आहेत. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात संबंधित प्रमुखांना किती दिवस दुकाने सुरू किंवा बंद ठेवावयाची याबाबत अधिकार दिले आहेत. 

अपलॉकच्या या टप्प्यात सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असतील. रेल्वे, विमानसेवा, परजिल्हा बससेवा बंद राहतील. सर्व दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ अशी असेल. नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. लग्न समारंभासाठी ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची तर अंत्यविधीसाठी केवळ २० व्यक्तींना परवानगी आहे. 
 
महापालिका हद्दीत हे सुरू राहील.. 
- सर्व दुकाने ९ ते ७ दरम्यान 
- मॉल्स, मार्केट 
- हॉटेल, रेस्टॉरंटचे किचन (घरपोच किंवा पार्सल सुविधा) 
- सर्व उद्योग, आस्थापना 
- शासकीय, खासगी बांधकामे 
- ऑनलाईन शिक्षण 
- शासकीय, खासगी कार्यालये (१० ते १५ कर्मचारी) 
- नॉन टीम मैदानी खेळ 
- गोल्फ कोर्सेस, फायरिंग रेंज, जिमन्यॉस्टिक, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब 
- प्लंबर, इलेक्ट्रीशिअन्स 
- गॅरेजेस, वर्कशॉप 
- शैक्षणिक संस्थांची कार्यालये 
- मंगल कार्यालय, लॉन्स (५० व्यक्तींची मर्यादा) 
- सलून दुकाने, ब्यूटी पार्लर, बार्बर शॉप 
- जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई पास घेणे आवश्यक 

हे असणार बंद.... 
- सर्व प्रकारच्या विमानसेवा 
- सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग संस्था 
- सिनेमागृह, स्विमिंग पूल्स, ऑडीटोरियम, सभागृह 
- सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 
- धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, धार्मिक ठिकाणे 
- रेल्वे सेवा 
- रेस्टाँरंट, हॉटेल्स 
- स्वीमिंग पुल 

वाहनांमध्ये मर्यादित संख्या हवी 
- टॅक्सी, कॅब-- चालक व ३ प्रवासी 
- रिक्षा--चालक व २ प्रवासी 
- चारचाकी वाहने--चालक व ३ प्रवासी 
- दुचाकी - २ व्यक्ती 

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon tomorrow start market and molls unlock process