बेशीस्त वाहनचालकांसाठी वाहतूक शाखा रस्त्यावर; एकाच दिवसात इतका दंड वसूल 

रईस शेख
Friday, 20 November 2020

बेशिस्त पार्किग, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल शीट, नो एट्रींमध्ये प्रवेश याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकूण ४३० वाहनांवर कारवाई करुन ४५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जळगाव : शहर वाहतूक शाखेतर्फे गुरुवारी सर्वत्र शहरात कारवाईची धडक मोहिम राबविण्यात आली. यात गोलाणी मार्केट, टॉवर चौक, महापालिका परिसरात बेशिस्त पार्किग, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल शीट, नो एट्रींमध्ये प्रवेश याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकूण ४३० वाहनांवर कारवाई करुन ४५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर ७५ हजार एवढा दंड वसूल करणे बाकी असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेने दिली. 

पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशाने शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात गुरुवारी सकाळपासून कारवाईची धडक मोहिम राबविण्यात आली. गोलाणी मार्केट येथे एकेरी वाहतूक असतांना, नियम न पाळता वाहतूक करणार्‍या वाहनांधारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहनधारकांकडून प्रत्येकी २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

दिवसभरात ४३० जणांवर कारवाई
शहरातील टॉवर चौक तसेच महापालिका परिसरात कारवाईसाठी मोर्चा वळविण्यात आला. यात वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी बेशिस्त वाहने, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, ट्रीपल सिट, परवाना न बाळगणे याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. दिवसभरात एकूण ४३० वाहनधारकांवर कारवाई करण्यात येवून ४५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर ७५ हजारांचा दंड वसूल करणे बाकी आहे. शहर वाहतूक शाखेच्या कारवाईने वाहनधारकांत एकच खळबळ उडाली होती. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon traffic police action not follow rules on road