esakal | खानदेशात साडे बारा लाख क्विंटल साखरचे यंदा उत्पादन
sakal

बोलून बातमी शोधा

sugar

खानदेशात यंदा साडे बारा लाख क्विंटल साखरचे उत्पादन !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गणपूर (ता चोपडा) : खानदेशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात असून पाच पैकी दोन कारखाने बंद झाले आहेत.यावर्षी आतापर्यंत 13 लाख 77 हजार 954 मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून 12 लाख 42 हजार 29 क्विंटल पेक्षा जास्त साखर उत्पादित झाली आहे.

सावेर(जि धुळे)मधील दत्तप्रभु कृपा ऍग्रो मध्ये साखरेसह गुळ पावडरची निर्मिती होते .यावर्षी या कारखान्याने परिसरात शेतकरी मेळावे घेऊन ऊस उत्पादन वाढीचे प्रयत्नही केले.आणि 89 हजार 800 मेट्रिक टन ऊस गाळप करून गूळ पावडर आणि साखर निर्मिती केली. नंदुरबार मधील शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने 4लाख 46 हजार345 मेट्रिक टनाचे गाळप करून 4 लाख41 हजार 135 क्विंटल साखर उत्पादित केली. साखर उतारा 9.28 टक्के इतका आहे. तर दुसऱ्या डोकारे (नवापूर )येथील आदीवासी सहकारी साखर कारखान्याने 1 लाख 14 हजार 746 मेट्रिक टनाचे गाळप करून 96 हजार 115 क्विंटल साखर उत्पादन करून 8.38 चा उतारा घेऊन हंगाम आटोपला आहे. आयान मल्टिट्रेड(पूर्वीचा पुष्पदंतेश्वर) या खासगी कारखान्याने 3 लाख 79 हजार 390 मेट्रिक टन गाळप करून 3लाख 84 हजार 545 क्विंटल स खर तयार केली आहे.आणि साखर उतारा 10.14 इतका आहे. जळगाव मधील संत मुक्ताई शुगर ने 3 लाख 47 हजार 673 टन ऊस गाळप करून 3 लाख 47 हजार248 क्विंटल साखर उत्पादन घेतले.

काही दिवसात कारखाने होतील बंद

उसाचा हंगाम तसेच उस गाळप करण्याचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे काही दिवसात सर्वच कारखाने ऊस संपल्याने बंद होतील. मात्र जे कारखाने बंदच आहेत ते देखील सुरू होतील ही, चर्चा आहे. परंतू ही चर्चा थांबवून ते कारखाने सुरू करण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.