जळगावमध्ये दोन गणेशमंडळातील वाद्यबंद करण्यावरून घमासान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

जळगावमध्ये दोन गणेशमंडळातील वाद्यबंद करण्यावरून घमासान


जळगाव : रामनगरातील गणेश मंडळातील (Ganesh Mandal) वाद्य बंद करण्याच्या वादातुन (Disputes) दोन गटात घामासान हाणामारी झाल्याची (Fights) घटना घडली. चाकु-विळा, लाठ्या काठ्यांसह दगडफेक होवुन देान्ही गटातील लोक जखमी झाली. वेळीच पोलिसांनी (Police) धाव घेतल्यावर वाद शांत होवुन परस्परविरुद्ध तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Disputes between the two groups

हेही वाचा: उसाचे थकीत पेमेंट मिळाले नाही तर..शेतकऱ्यांचा इशारा


रामनगरातील वंदनाबाई सौदागर खामकर यांच्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, मनकर्णाबाई यांच्या दुकानात गणपती बसवीला असून शुक्रवारी रात्री सौदागर खामकर यांनी वाद्य बंद कारण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन भुऱ्या याने चाकु काढून हल्ला चढवला तर, राजेंद्र मराठे याने विळ्याने वार केल्याने सौदागर खामकर, अशोक खामकर दोन्ही भाऊ जखमी झाल्याने एकच गोंधळ उडून दगडफेकीला सुरवात झाली.

हेही वाचा: जळगावः राज्यभर धुमाकुळ घालणारे सोनसाखळी चोर अटकेतपोलिस आल्याने वाद निवळला
रामनगर भागात दगडफेकीसह हाणामारी झाल्याचे वृत्तकळताच निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसींग पाटिल, इम्रान सैय्यद, गोविंदा पाटिल यांच्यासह पोलिस ठाण्याची कुमक वेळीच घटना स्थळी दाखल होवुन हाणामारी करणार्यांना जागेवरच प्रसाद देत जखमींना जिल्‍हारुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Marathi News Jalgaon Two Ganesh Mandal Disputes Fights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime Newsjalgaon news