उसाचे थकीत पेमेंट मिळाले नाही तर..शेतकऱ्यांचा इशारा

रावळगाव साखर कारखान्याची साखर, बगॅस व मोलेसिस जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचे निर्देशही दिले होते.
उसाचे थकीत पेमेंट मिळाले नाही तर..शेतकऱ्यांचा इशारा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): चाळीसगाव तालुक्यातील शेकडो उस उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmer) मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील साखर कारखान्याला (sugar factory) गेल्या वर्षी उस दिला होता. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट मिळाले नसल्याने हे शेतकरी हवालदील झाले आहेत. तीन दिवसात थकीत पेमेंटबाबत कारवाई न झाल्यास आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा पळासरे (ता.चाळीसगाव) येथील बाळासाहेब देवकर यांच्यासह शेतकऱ्यांनी साखर आयुक्त, पुणे (Sugar Commissioner)यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

उसाचे थकीत पेमेंट मिळाले नाही तर..शेतकऱ्यांचा इशारा
जळगावः राज्यभर धुमाकुळ घालणारे सोनसाखळी चोर अटकेत

एस.जे. शुगर रावळगाव (ता. मालेगाव) या कारखान्यास सन 2020 व 21 या गाळप हंगामात चाळीसगाव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उस दिला.मात्र वर्षे होत आले तरी अद्यापही सदर कारखान्याकडून थकीत पेमेंट अद्यापही अदा केले नाही. थकीत पेमेंट मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वेळेेवेळी साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांच्याकडे तक्रारी केल्या, प्रसंगी आंदोलनाचे इशारे दिले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर साखर आयुक्तांनी गाळप हंगाम 2020 व 21 मधील थकीत एफआरपी एक्कम 17 कोटी 98 लाख 76 हजार तसेच उस नियंत्रण आदेश 1966 कलम 3 (3 ए) नुसार सदर रकमेवर 15 टक्के देय होणारे व्याज वसुली करण्याबाबत नाशिक जिल्हाधिकारी व मालेगाव तहसीलदार यांना निर्देेश दिले होते. त्यानंतर रावळगाव साखर कारखान्याची साखर, बगॅस व मोलेसिस जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र हे लिलाव होवू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा संबंधीतांकडे तक्रारी केल्या.

उसाचे थकीत पेमेंट मिळाले नाही तर..शेतकऱ्यांचा इशारा
दोन वर्षात सरकारने शेतकऱ्यांना दमडीही दिली नाही-गिरीश महाजन

याप्रकरणी जप्त केेलेली साखर विक्री करतांना केंद्र सरकारने ठरवलेले साखरेचे भाव व सध्याचे बाजार भाव यांचा विचार करून तसेच बगॅस व मोलॅसिस बाबतही बाजार भाव विचारात घेऊन जाहीर लिलाव करण्याबाबत तात्काळ निर्णय घेऊन थकीत एफआरपी सर्व संबंधीत उस पुरवठादार शेतकऱ्यांना विलंब व्याजासह अदा करणेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक(साखर) अहमदनगर यांनी अलीकडे देवूनही कार्यवाही होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग मुंंबई यांचीही भेट घेतली. सचिवांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देतो असे आश्वासन दिले होते.मात्र मालेगाव तहसील प्रशासनाकडून शासनाची दिशाभूल व शेतकऱ्यांची केल्याचे निदर्शनास येत आहे.येत्या तीन दिवसात थकीत उसाचे पेमेंटबाबत कार्यवाही न झाल्यास आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा बाळासाहेब देवकर यांच्यासह शेतकऱ्यांनी साखर आयुक्त, पुणे यांना(ता.17) रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com