लॉकडाउनमध्ये झाले बोर...दोघी बहिणींनी घरात केला असा करिष्मा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखी माणसाची अवस्था झाली आहे. पक्ष्यांना पिंजऱ्यात टाकताना आपण त्यांचा विचार करतो का ? आता लॉक डाऊनमुळे कळाले सगळ्यांना चित्र पाहिल्या वर आनंदी वाटावा हेही आमच्या साठी खूप आहे.

जळगाव : लॉकडाउनमध्ये घरी बसून अगदी बोर होते. घरबसल्या पेटींगचा छंद जोपासत पर्यावरण रक्षणाचा संदेश येथील हर्षदा व विशाखा विलास बोडके यांनी नागरिकांना दिला आहे. 
हर्षदा व विशाखा म्हणाल्या आम्हांला व आईला चित्रकलेची फार आवड आहे. आम्ही कॉलेज क्लास चालू असताना चित्रकलेला फार वेळ देऊ शकलो नाही. पण कोरोनाच्या सदयस्थितीत बाहेर पडता येत नाही. कॉलेज नाही की क्लास नाही. त्यामुळे वेळ चांगला घालवण्यासाठी चित्र काढणेच योग्य असे ठरवले. कागदावर चित्रे काढता काढता आम्ही भिंतीवर पेटीग करायचे ठरवले. टे प्रकारातील चित्र आम्ही हॉलच्या भितीवर काढले. निसर्ग पाहिला की मन उल्हासित व आनंदी होते. झाडे लावा व झाडे जगवा हा संदेश ही समाजाला मिळेल हा उद्देश होता. 

माणसाची अवस्था पिंजऱ्यातील पक्षासारखी 
पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखी माणसाची अवस्था झाली आहे. पक्ष्यांना पिंजऱ्यात टाकताना आपण त्यांचा विचार करतो का ? आता लॉक डाऊनमुळे कळाले सगळ्यांना चित्र पाहिल्या वर आनंदी वाटावा हेही आमच्या साठी खूप आहे. ही कला दोघीही जपणार आहे नेहमीच. आयुष्यात वेगवेगळे रंग भरण्यासाठी कला जोपासावी लागते. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. सरावाने मग सोपे होत. विशाखा व हर्षदा येथील जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या कन्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon two sister lockdown home decorate wall painting