परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठाने घेतला असा निर्णय 

राजेश सोनवणे
Thursday, 17 December 2020

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था आणि विद्यापीठ प्रशाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांची डिसेंबर २०२०/जानेवारी २०२१ मधील परीक्षा कोविड-१९ प्रादूर्भाव लक्षात घेता

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालय तसेच परिसंस्‍था, प्रशाळांमधील परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. सर्व अभ्‍यासक्रमांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था आणि विद्यापीठ प्रशाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांची डिसेंबर २०२०/जानेवारी २०२१ मधील परीक्षा कोविड-१९ प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात स्मार्ट फोन, लॅपटॉप, वेब कॅमेरासह डेस्कटॉप संगणक याव्दारे ५ जानेवारी पासून सुरु होणार आहेत.  

ऑफलाईन होणार होती परीक्षा
विद्यापीठाने ५ नोव्हेंबर २०२० च्या पत्रान्वये वरील परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याबाबत महाविद्यालयांना कळविले होते. तसेच २८ डिसेंबरपासून काही अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतू कोरोना प्रादूर्भाव विचारात घेऊन विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने ५ जानेवारीपासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांना सॉफटवेअरच्या हाताळणी व सरावाकरीता सराव चाचणी (Mock Test) चे आयोजन करणे आवश्यक आहे. याकरीता दि.२८ डिसेंबरपासून होणाऱ्या परीक्षा ५ जानेवारीपासून सुरु होतील. सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येणार आहेत. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन केंद्राचे संचालक बी.पी.पाटील यांनी कळविले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon university exam new decision collage