प्रेयसीसाठी पत्नीसह मुलांना हाकलले घरातून 

रईस शेख
Tuesday, 10 November 2020

गेल्या काही दिवसांपासून एक महिला घरी येत असून पतीला विचारल्यावर त्यांनी नातेवाईक असल्याचे सांगत तेव्हा वेळ मारुन नेली. मात्र, दोघांचे फोटो पाहिल्यावर दोघांमध्ये संबंध असल्याचे निष्पन्न झाले.

जळगाव : शहरातील बांभोरी नाक्याजवळ वास्तव्यास असलेल्या दांपत्यात वाद होऊन पतीने दोन मुलांसह पत्नीला घरातून हकलून लावल्याचा प्रकार समोर आला. पीडित विवाहीतेने दिलेल्या तक्रारीनुसार पती, सासू व पतीची प्रेयसी अशा तिघांविरुद्ध तालुका पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

सदर प्रकरणी सुनंदा दिनेश भोळे (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रार दिली आहे. यात म्‍हटले आहे, की त्या पती दिनेश कडू भोळे, मुलगा अनिरुद्ध, आदित्य अशांसह बांभोरी नाका परिसरात वास्तव्यास आहेत. पती शेतीपयोगी साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. लग्न झाले तेव्हा ५० हजार वरदक्षणा, अंगठी, टोंगल, टॉप्स, मंगलपोत असे दागिने माहेरच्यांनी दिले होते. तद्‌नंतर घरातून वेगळे निघाल्यावर घर घेण्यासाठी भावाकडून दीड लाख रुपये देखील आणून दिल्यावर पती व माझ्या नावे स्वतःचे घर झाले. 

ती महिला रोज यायची घरी
गेल्या काही दिवसांपासून एक महिला घरी येत असून पतीला विचारल्यावर त्यांनी नातेवाईक असल्याचे सांगत तेव्हा वेळ मारुन नेली. मात्र, दोघांचे फोटो पाहिल्यावर दोघांमध्ये संबंध असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत विचारल्याने पतीसह सासूकडून छळाला सुरवात झाली. २३ ऑक्टोबरला पती दिनेश, सासू सरस्वतीबाई अशांनी अंगावरील दागिने काढून घेत दोन्ही मुलांसह घरातून हकलून लावल्याची तक्रार सुनंदा भोळे यांनी दिली. या सर्व प्रकाराला पतीची प्रेयसी जबाबदार असून पती- सासूसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon wife and children were evicted from the house love matter