त्‍यांनी जुळविले २१ एड्‌सग्रस्‍तांचे विवाह; उद्या दोन जोडपे अडकणार बंधनात

देवीदास वाणी
Monday, 30 November 2020

एड्‌स हा जीवघेणा आजार आहे. मात्र औषधोपचार योग्य पध्दतीने घेतल्यास असा रुग्ण बरा होवून सदृढ व्यक्तीप्रमाणे कामे करू शकतो. त्यांचेही लग्न होवू शकते. त्यांनाही मुले होवू शकतात. चांगल्याप्रकारे ते जीवन जगू शकतात. असा अनुभव श्री.सपकाळे यांचा आहे. 

जळगाव : एच.आय.व्ही. अर्थात एड्‌सग्रस्तांना समाज वाळीत समाज टाकतो. मात्र याच वाळीत टाकलेल्यांनाही योग्य उपचार घेवून जीवन जगता येते, त्यांचेही विवाह होतात. अशा एड्‌सग्रस्त एकवीस जोडप्यांचे आतापर्यंत विवाह लावून देण्याचा सामाजिक उपक्रम कानळदा (ता.जळगाव) येथील सेवानिवृत्त पोलिस उपअधिक्षक पुंडलिक सपकाळे यांनी राबविला आहे. उद्या (ता.१) जागतिक एड्‌स दिनानिमित्त दोन एड्‌सग्रस्त यूवक युवतींचा विवाह कानळदा येथे होणार आहे. 
एड्‌स हा जीवघेणा आजार आहे. मात्र औषधोपचार योग्य पध्दतीने घेतल्यास असा रुग्ण बरा होवून सदृढ व्यक्तीप्रमाणे कामे करू शकतो. त्यांचेही लग्न होवू शकते. त्यांनाही मुले होवू शकतात. चांगल्याप्रकारे ते जीवन जगू शकतात. असा अनुभव श्री.सपकाळे यांचा आहे. 
पत्रकार परिषदेत सपकाळे म्हणाले, की शहीद हेमंत करकरे हे चंद्रपूरला असताना त्यांच्यासोबत मी होतो. एका वेश्‍या वस्तीतील महिलांच्या मुलांचे पूनवर्सन करण्याचा ध्यास त्यांचा होता. त्यांना चांगल्या शाळेत शिक्षण देवून त्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न होता. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात करकरे शहीद झाले. त्यांच्या व इतर शहीदांच्या स्मृतीनिमित्त मी गेल्या १३ वर्षांपासून एड्‌सग्रस्त युवक-युवतीचे विवाह लावून त्यांना शहीद करकरे यांना एकप्रकारे श्रध्दांजली वाहतो. 

जेथे गेले तेथे उपक्रम
राज्यात अनेक ठिकाणी विवाह लावून समाजात जनजागृती करण्याचा उपक्रम राबविले. पुणे येथील विजय भेंडे हे एडसग्रस्त असून त्याचा पहिला विवाह लावून दिला. ज्या- ज्या ठिकाणी बदली झाली तेथे मी दरवर्षी असा उपक्रम राबवितो. उद्या (ता.१) जागतिक एड्‌स दिनी अहमदनगर व पुणे, सोलापूर व सातारा येथील दोन एड्‌सग्रस्त यूवक यूवतींचा विवाह कोरोना संसर्गाचे नियम पाळून होणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon world aids day in arainge two couple marriage