सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णाचा जळगाव जिल्ह्यात मृत्यू नाही ! 

सचिन जोशी
Thursday, 5 November 2020

दिवसभरात ७४ रुग्ण बरेही झाले. बरे झालेल्यांचा आकडाही ५१ हजार ५०४वर पोचला आहे. बळींचा आकडा चार दिवसांपासून १२६९वर कायम आहे. ​

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गात ऑक्टोबर महिना दिलासादायक गेल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही चांगले परिणाम दिसून येत आहे. बरे होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा अधिक आढळून येत असल्याच्या मालिकेत आजही सातत्य होते. तर सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात एकाही रुग्णाचा बळी गेला नाही.

आवश्य वाचा- शिवसेनेचे चंद्रकांत पाटीलांना खुले आव्हान; जळगावातील भाजपचे पाच नगरसेवकांचे आगोदर राजीनामे घ्या, मग मंत्री ठाकूरांचा राजीनामा मागा ! 

जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी अवघे ३० रुग्ण आढळल्यानंतर गुरुवारी त्यात पुन्हा वाढ होऊन नव्या बाधितांची संख्या ६० नोंदली गेली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ४२१ झाली आहे. तर दिवसभरात ७४ रुग्ण बरेही झाले. बरे झालेल्यांचा आकडाही ५१ हजार ५०४वर पोचला आहे. बळींचा आकडा चार दिवसांपासून १२६९वर कायम आहे. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १२, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ १४, अमळनेर ३, चोपडा ७, पाचोरा १, भडगाव १, यावल २, जामनेर १, रावेर ७, चाळीसगाव ७, मुक्ताईनगर २.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaonCorona patients have not died in Jalgaon district for three days