esakal | कोरोनाच्या काळात गायक गावी आला; आणि गावाचा कारभारी झाला! 

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या काळात गायक गावी आला; आणि गावाचा कारभारी झाला! 

समोर बलाढ्य राष्ट्रवादी व विद्यमान सरपंचासह भाजपचे पॅनल उभे होते, त्यांना टक्कर देत त्यांनी सर्वच्या सर्व आठ जागांवर विजय मिळविला.

कोरोनाच्या काळात गायक गावी आला; आणि गावाचा कारभारी झाला! 
sakal_logo
By
योगेश सोनार

शेंदुर्णी : कामानिमित्त बाहेरगावी असलेले नोकरदार, कामगार कोरोना काळात लाॅकडाऊन लागल्यावर आप आपल्या गावी परत आले होते. त्यानुसार जामनेर तालुक्यातील मेणगाव येथील गायक गणेश पाटील उर्फ पी. गणेश गावी परत आले. 
 

आवश्य वाचा- अभ्यास, करिअर शोधता..शोधता उच्चशिक्षीत तरुणाच्या हाती गावगाड्याचा कारभार
 

मेणगाव या गावी चार महिने वास्तव्यास असलेल्या गायक गणेश पाटील उर्फ पी. गणेश यांनी गावात राहत असताना गावाचा कायापालट व्हावा, या दृष्टीने रचना आखली, परंतु निवडणुकीत उभे राहून कारभार हातात घेतल्याशिवाय शक्य नसल्याचे त्यांचे लक्षात आले, नी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व इतर सर्व तरुण यांचे मत विश्वासात घेऊन अपक्ष पॅनल उभे केले. समोर बलाढ्य राष्ट्रवादी व विद्यमान सरपंचासह भाजपचे पॅनल उभे होते, त्यांना टक्कर देत त्यांनी सर्वच्या सर्व आठ जागांवर विजय मिळविला. 

आवर्जून वाचा- पैशांसाठी तरुणाचे अपहरण; मग काय, व्हाॅटसअप लोकेशनद्वारे पोलिसांचा सिनेस्टाईल शोध सुरू 
 

एका जागेवर नोटाला पसंती
एका जागेवर नोटाला सर्वाधिक मते मिळून नोटाला पसंती देण्यात आली. या जागेवर सिने गायक गणेश यांचा उमेदवार तांत्रिक अडचणीमुळे रद्दबादल ठरला. त्या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून येणार असे गृहीत होते. मात्र ग्रामस्थांनी नोटाला १९१ मध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार उमेदवाराला १०२ मत देऊन त्याच ग्रामपंचायतीत नोटांचा वापर यशस्वी करून उभे असलेले उमेदवार नाकारले. जागेचा निर्णय राखीव असला तरी पुन्हा त्या जागेसाठी निवडणूक होण्याची शक्‍यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे