मुलाने बाहेरून आवाज दिला पण...

शंकर भामेरे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जामनेर तालुक्यातील वाकोद येथील ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात छताला गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. सचिन लालचंद गोसावी (वय ४०, रा. वाकोदवाडी) हा मजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवित होता.

पहूर (ता. जामनेर) : मजुरी करून घराचा उदरनिर्वाह चालवित होता. पण त्‍याने अचानक टोकाचा निर्णय घेत घराच्या छताला दोर बांधून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना घडली. दरम्‍यान बाहेर असलेल्‍या मुलाने दरवाजा ठोठावत आवाज दिला. पण आतून कोणत्‍याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्‍याने दरवाजा तोडून पाहिले तर वडीलांचा मृतदेह समोर दिसला. 

जामनेर तालुक्यातील वाकोद येथील ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात छताला गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. सचिन लालचंद गोसावी (वय ४०, रा. वाकोदवाडी) हा मजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. त्याने घराचा दरवाजा बंद करून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सचिन गोसावी यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत अजय लालचंद गोसावी यांनी पहूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली आहे.

आवाज दिला..शेवटी दरवाजा तोडला
दुपारी चारच्या सुमारास पियुष सचिन गोसावी या मूलाने आपल्या वडिलांना घराचा दरवाजा उघण्यासाठी आवाज दिला. परंतु घरातून काही एक आवाज न आल्यामुळे तो शेजारी राहणाऱ्या काकांकडे धावला. त्याचे काका अजय लालचंद गोसावी यांनीही आवाज देऊन पाहिले; मात्र घरातून कुठलाही प्रतिसाद त्यांना न मिळाल्याने त्यांनी शेजारच्या दोन- तीन जणांना बोलावून घराचा दरवाजा उघडला असता सचिन लालचंद गोसावी हा त्यांना छताला असलेल्या हुकाला गळफास अडकवून लटकलेल्या अवस्थेत आढळला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गोसावी यांच्या पश्च्यात पत्नी सुनीता, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner house father death and child Voice door

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: