esakal | खानदेशनी परंपरा अन्‌ बरच काही सांगणारे ‘खानदेश वाहिनी’ चॅनल
sakal

बोलून बातमी शोधा

khandesh vahini channel

खानदेशातील वारकरी, विचारवंत, साहित्‍यिक व नाट्य कलावंत आणि चित्रपट कलाकारांच्या सहकार्याने खानदेश वाहिनी सुरू झाली असल्याचे खानदेश वाहिनी
ॲपचे निर्माता अभियंता तुषार पाटील यांनी बोलतांना सांगतिले.

खानदेशनी परंपरा अन्‌ बरच काही सांगणारे ‘खानदेश वाहिनी’ चॅनल

sakal_logo
By
शंकर भामेरे

पहूर (ता .जामनेर) : मनोरंजन क्षेत्रात खानदेशला नावलौकिक मिळवून देण्याच्या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन पहूर येथील उदयोन्मुख कलावंत ऋषिकेश चौधरी यांच्यासह खानदेशातील तंत्रस्नेही कलावंतांनी ‘खानदेश वाहीनी' टीव्ही चॅनेल सुरु केले आहे. जळगाव, धुळे, नंदूरबार व नाशिकसह संपूर्ण राज्यभरातून या वाहिनीला दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच २८ ऑगस्ट रोजी खानदेश वाहिनी टीव्ही चॅनल प्ले स्टोअरवर लॉंच करण्यात आले आहे.
 
खानदेशातील वारकरी, विचारवंत, साहित्‍यिक व नाट्य कलावंत आणि चित्रपट कलाकारांच्या सहकार्याने खानदेश वाहिनी सुरू झाली असल्याचे खानदेश वाहिनी
ॲपचे निर्माता अभियंता तुषार पाटील यांनी बोलतांना सांगतिले. मुळचे पारोळ्याचे असलेले तुषार पाटील हे सध्या दिल्ली येथे असून यांच्या दीड महिन्यांच्या अथक परिश्रमातून खानदेश वाहिनी ॲप मूर्त रूपास आले आहे. 


अशी आहेत ॲपची वैशिष्ट्ये
खानदेशी माणसांनी खानदेशी जनतेच्‍या सेवेसाठी बनवलेले खानदेशी मातीतील पहीले
ॲपलिकेशन. ॲपलिकेशनमध्‍ये खानदेशी भाषेतील गाणे, वेबसिरिज, एमपी थ्री, खानदेशी लघुपट, खानदेशी चित्रपट तसेच खानदेशी माणसांसाठी हक्‍काचे लेखपट, ब्‍लॉग उपल्‍ब्‍ध आहेत. खानदेशी साहित्‍यिक/रंगमंच कलाकारांसाठी सदर ॲप हक्‍काचे व्‍यासपीठ आहे.

खानदेशी कलावंतांची कमाल
ॲप निर्मीतीसाठी अनेक खानदेशी कलावंतांचा यात सहभाग राहिला. पण यात ॲप बनविण्यात कलावंत कविता पाटील यांची संकल्पना राहिली. तर अभियंता तुषार पाटील यांनी केली असून पहूर येथील ऋषिकेश चौधरी ॲपचे संयोजन करीत आहे. वाहिनीचे बोधचिन्‍ह ईश्वर माळी यांनी साकारले आहे; तर कवी मोहन पाटील व अहिराणी चित्रपट दिग्दर्शक ईश्वर माळी यांनी ब्रीदवाक्य सुचविले आहे. खानदेशातील तरुणांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.


"मनोरंजन क्षेत्रात खानदेशला नावलौकिक मिळवून देण्याच्या ध्येयाने प्रेरीत आम्ही प्रथमच खानदेश वहिनी टीव्ही चॅनेल सुरु केले असून गुगल प्ले स्टोअरवरून ते आपणांस इन्स्टॉल करता येईल. खानदेशातील प्रत्येक व्यक्तीने ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावे. ज्याद्वारे खानदेशची समृद्ध परंपरा, इथल्या माणसाचं सुख- दुःख आपल्यापर्यंत आम्हाला पोहोचविता येईल. खानदेश वहिनी म्हणजे खानदेशी माणसाचे एक हक्काचे व्यासपीठच आहे."

- ऋषिकेश चौधरी, पहूर संयोजक -खानदेशी वहिनी टिव्ही चॅनेल
 

संपादन : राजेश सोनवणे