चोरट्यांना घरात सापडले घबाड

सुरेश महाजन
Thursday, 3 September 2020

नेरी बु. येथील रहिवाशी अशोक काशीराम बावस्कर हे जामनेर रोडलगत असलेल्या नवीन वसाहतमधील शिवाजीनगरात राहतात. बुधवारी सकाळी पती- पत्नी बोदवड येथे आपल्या शालकाच्या घरी गेले होते. यावेळी सदरची घटना घडली. सदर घटनेची तक्रार जामनेर पोलिसात दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.

जामनेर : तालुक्यातील नेरी बुद्रुक येथील जामनेर रोडलगत असलेल्या नवीन वसाहतीमधील शिवाजीनगरमध्ये धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये चोरट्यांनी तब्‍बल एक लाख ऐंशी हजार रुपये रोख रक्‍कमेसह ४० भार चांदी आणि एक तोळे सोने लंपास केले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेपण वाचा- खानदेशनी परंपरा अन्‌ बरच काही सांगणारे ‘खानदेश वाहिनी’ चॅनल
 

नेरी बु. येथील रहिवाशी अशोक काशीराम बावस्कर हे जामनेर रोडलगत असलेल्या नवीन वसाहतमधील शिवाजीनगरात राहतात. बुधवारी सकाळी पती- पत्नी बोदवड येथे आपल्या शालकाच्या घरी गेले होते. यावेळी सदरची घटना घडली. सदर घटनेची तक्रार जामनेर पोलिसात दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर पोलिसचे एपीआय धरमसिंग सुन्दरडे यांनी रात्री आठच्या सुमारास घटनास्थळी भेट देवून घटनेची पाहणी केली मात्र रात्री उशीर झाल्याने गुरुवारी सकाळी या घटनेची अधिक चौकशी करण्याकरिता स्वान पथक पाचारण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली 

घरी आल्‍यावर पाहिले अन्‌ 
तेथून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना घराबाहेर लोखंडी गेट उघडे दिसले. घराचे प्रवेशद्वारा कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांना चोरीचा संशय आला. घराच्या बैठक हॉलनंतर किचन व त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडलेला होता. तर कपाटातील लॉकर बघितले असता त्यात ठेवलेले एक लाख रुपये रोख आणि हातातील 40 भार चांदीच्या पाटल्या; तसेच पाच- पाच ग्रामच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने बावस्कर परिवार विवंचनेत सापडला आहे

मुलाच्या लग्‍नाची होती तयारी
दिवाळीनंतर मुलाचे लग्न करण्याचे स्वप्न पाहून त्यासाठी आतापासूनच त्‍यासाठीची तजवीज म्‍हणून एक लाख ऐंशी हजार रुपये जमा करून ठेवले होते. काही महिन्यांपूर्वी अशोक बावस्कर यांनी बोदवड येथील आपले शालक यांना उसनवारी म्हणून ही रक्कम दिली होती. काही दिवसांआधीच सदर रक्कम शालकाने परत आणून दिल्यानंतर ती घरात ठेवून होती. परंतु ही रक्‍कम कामी न येता चोरट्यांनीच त्‍यावर डल्‍ला मारला.

संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner one lakh cash or gold and silver robbery home