रात्रीचा थरार..मोटारसायकलचा पाठलाग करत डोळ्यात फेकली मिरची पुड

शंकर भामेरे
Monday, 5 October 2020

राजू पाटील हे मोटरसायकल (एमएच. १९ सीई ६७६१) निघाले होते. सोबत अविनाश संजय पवार (रा. जांभूळ) ह देखील होता. दिवसभरात दुकानात जमा झालेली वीस हजार रुपयाची रक्कम सोबत होती. 

पहूर (ता जामनेर) : जामनेर तालुक्यातील पहूर येथील शेतकरी ॲग्रो सेंटरचे संचालक राजू धोंडू पाटील जांभूळ गावी घराकडे जात असताना लुटण्याचा प्रयत्‍न झाला. मोटारसायकलने मागून पाठलाग करत डोळ्यात मिरची पावडर फेकून प्रयत्‍न झाल्‍याचा थरार घडला. 
पहूर येथील व्यापारी राजु धोंडू पाटील नेहमीप्रमाणे दुकान बंद करून जांभूळ या गावी घराकडे निघाले. दरम्‍यान रात्रीचे नऊ- दहा वाजले असल्‍याने रस्‍ता सामसुम होता. राजू पाटील हे मोटरसायकल (एमएच. १९ सीई ६७६१) निघाले होते. सोबत अविनाश संजय पवार (रा. जांभूळ) ह देखील होता. दिवसभरात दुकानात जमा झालेली वीस हजार रुपयाची रक्कम सोबत होती. 

मागून होती मोटारसायकल
हिवरखेडा मार्गे जात असताना मागून मोटरसायकल येत असल्‍याचे आढळले. मोटारसायकल स्‍पीड कमी केल्‍यानंतर मागील मोटारसायकलस्‍वाराने देखील स्‍पीड कमी करत गाडीचे लाईट बंद केला. यामुळे सदर मोटरसायकल ही पिंपळगाव तांडा गेली असावी; म्हणून मी माझी मोटरसायकल जांभूळ येथे जाण्यासाठी निघालो. मोटरसायकल ही कमानी तांडा शिवारात तांडापासून दोन किलोमीटरवर आली असताना मागून येणाऱ्या मोटरसायकलवरील अज्ञात इसमांनी डोळ्यात मिरचीची पावडर फेकली. परंतु ते चुकवत मोटरसायकल मागे फिरविणार तोपर्यंत मोटरसायकलवरील एकाने खिशातून एक हजार रुपये काढून घेतले, तर दोघांनी  हातातील २० हजार रुपयांची बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती रस्त्यावर कुठेतरी घाईगडबडीत पडले. 

अशी आहे त्‍यांची ओळख
मोटरसायकलच्या उजेडात पाहिले असता विना नंबर प्लेट असलेली काळ्या रंगाची पल्‍सर असल्याचे दिसले. त्यावरील इसमापैकी एक बुटका अंदाजे वीस वर्षे वयाचा दुसरा शरीराने मजबूत असलेला उंची अंदाजे सहा फूट तर तिसरा शरीराने मजबूत उंची सहा फूट त्याचे डोक्यावरील केस असे तिघांचे वर्णन पाटील यांनी तक्रारीत केले आहे.

आरोपींना रंगेहाथ पकडले
अविनाश पवार आम्ही दोघी घाबरून गेल्याने मोटर सायकल फिरवून कमानी तांडापर्यंत आले. तेथे विष्णू चव्हाण व योगेश राठोड हे दोन गावकरी भेटले असता त्यांना घडलेली घटना सांगितली. यानंतर योगेश राठोड यांच्या रिक्षाने पिंपळगाव गावी आलो असता अर्ध्या तासाने योगेश यास फोन आला की पल्सर मोटरसायकल पिंपळगाव बुद्रुककडे निघाल्‍याचे सांगितले. तसेच घटनेबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली होती. यानंतर तात्काळ पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, ज्ञानेश्वर ढाकणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत लिंगायत हे घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना तात्काळ रंगेहात पकडण्यात आले असून पहूर पोलीस ठाण्यात राजू धोंडू पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत कडुबा चौधरी, गोपाळ सुखदेव भिवसने, चेतन प्रकाश जाधव यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner road night motorcycle chase and chilly powder eye