जामनेरातही निर्यातक्षम केळी उत्पादन,इराणला जाणार प्रथमच केळी

निर्यात होणारी केळी जामनेर तालुक्यातून उत्पादन झाली आहे हे विशेष! यावर्षी जामनेर पट्ट्यातून प्रथमच १०० कंटेनर्स केळी निर्यात होण्याची अपेक्षा आहे.
Banana
Banana


रावेर : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून प्रथमच यावर्षी इराण (Iran) या देशात केळी निर्यातीला (Banana exports) सुरवात होत आहे. मागील आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर एक कंटेनर केळी निर्यात झाल्यावर आज पासून नियमितपणे ही कापणी आणि निर्यात होणार आहे.

Banana
जळगाव जिल्ह्याला सहा लाखांवर डोस मिळणार;‘मिशन कवच कुंडल’अभियान


एरवी जिल्ह्यातील केळी निर्यात मार्च ते जून महिन्यात होते. केळी उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या निर्यात कंपनीच्या मदतीने आता ऑक्टोबर महिन्यात देखील प्रथमच केळीची निर्यात होणार आहे. ही निर्यात होणारी केळी जामनेर तालुक्यातून उत्पादन झाली आहे हे विशेष! यावर्षी जामनेर पट्ट्यातून प्रथमच १०० कंटेनर्स केळी निर्यात होण्याची अपेक्षा असून पुढील वर्षी ३०० कंटेनर्स केळी निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


निर्यातीत जामनेरची भर
जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. एरवी केळी निर्यात मुख्यत्वे रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातून होते. या निर्यातीचा काळही मार्च ते जून असा ठरलेला आहे. मात्र जागतिक बाजारपेठेत केळीची मागणी वर्षभर असते. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील जामनेर, पहुर, पिंपळगाव भागात चांगले केळी उत्पादन होते, याचे निरीक्षण तांदलवाडी (ता. रावेर) येथील महाजन बनाना एक्सपोर्टस्‌चे संचालक प्रेमानंद महाजन आणि प्रशांत महाजन यांनी केले होते.

Banana
हतनूरला गाळाचा विळखा;यंदाही तापीतून दोनशे टीएमसी पाणी समुद्रात


‘फ्रूट केअर’ ची व्यवस्था
केळी निर्यात करणाऱ्या देसाई कंपनीच्या मदतीने महाजन बंधूंनी त्या भागात सुमारे ४०- ५० शेतकऱ्यांशी संपर्क साधला आणि केळी निर्यात करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या केळी बागेत सुमारे १०० हेक्टर क्षेत्रात जुलै महिन्यात फ्रूट केअर’ केले. फ्रूट केअर म्हणजे घडांची छाटणी, घडाला बड इंजेक्शन देणे, घडाला स्करटिंग बॅगमध्ये झाकणे,वेळेवर खत, पाणी देणे इत्यादी यामुळे आता जामनेर तालुक्यातही निर्यातक्षम केळीचे उत्पादन सुरू झाले आहे.

आता नियमित कापणी
मागील आठवड्यात पहुर येथील भास्कर शंकर पाटील आणि सोनाळा येथील दिलीप पाटील यांच्या केळी बागेतील केळीची निर्यातीसाठी प्रायोगिक तत्त्वावर कापणी झाली आहे. नवरात्रीपासून नियमितपणे कापणी होईल. यासाठी जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख यांचे सहकार्य मिळत असल्याचे प्रशांत महाजन यांनी सांगितले.

यंदा २ हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट
यावर्षी जामनेर पट्ट्यातून १०० कंटेनर्स म्हणजे २ हजार टन केळी निर्यातीचे उद्दिष्ट आहे. या निर्यातक्षम केळीला बाजारभावापेक्षा ५० ते १०० रुपये क्विंटल जास्त भाव देण्यात येत आहे. आगामी वर्षांत या भागातून ३०० कंटेनर्स केळी निर्यातीचे उद्दिष्ट आहे.

Banana
हुतात्मा गणेश सोनवणे अंनंतात विलीन;आईच्या हंबरड्याने मन स्तब्ध

वर्षभर केळी निर्यात शक्य
रावेर तालुक्यातून मार्च ते जून या महिन्यात केळीची निर्यात होते. जुलै ते सप्टेंबर या काळात बऱ्हाणपूर भागात दर्जेदार केळी उत्पादन होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात जामनेर, चोपडा या तालुक्यातील केळी उत्पादन दर्जेदार असते. त्यामुळे आता जिल्ह्यातून वर्षभर केळी निर्यात केली जाईल, असे नियोजन असल्याचे प्रेमानंद महाजन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com