esakal | सावधान..बंद घरे चोरट्यांचे ‘टार्गेट’ 
sakal

बोलून बातमी शोधा

thief lock home target

शहरातील पुरूषोत्तमनगरमधील गजानन भागवत पाटील यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कुलूप-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व पाच हजारांची रोकड असा ७५ हजार ५०० रूपयांचा चोरट्यांनी लंपस केला.

सावधान..बंद घरे चोरट्यांचे ‘टार्गेट’ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जामनेर (जळगाव) : नवरात्रोत्सवासह सणांच्या पार्श्वभूमीवर घराला कुलूप लावून बाहेरगावी जाणाऱ्या जामनेरकरांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून, गेल्या दोन दिवसांत सोने-चांदीचे दागिने व कारसह ७५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. 
शहरातील पुरूषोत्तमनगरमधील गजानन भागवत पाटील यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कुलूप-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व पाच हजारांची रोकड असा ७५ हजार ५०० रूपयांचा चोरट्यांनी लंपस केला. या प्रकरणी भागवत पाटील पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तसेच शिवाजीनगरमधून कृष्णा माळी यांची आर्टिका कार चोरून नेल्याची घटना घडली आहे. या शिवाय चोरट्यांनी परिसरातील आणखी काही घरांचा चोरीच्या उद्देशाने शोध घेतला. मात्र, रहिवाशांच्या सतर्कतेमुळे त्या सर्वांना धूम ठोकावी लागली. 

गस्त वाढविण्याची मागणी 
नवरात्रोत्सवासहदसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक घराला कुलूप लावून इतरत्र गावांना जातात. त्यामुळे आता पोलिस प्रशासनानेच नागरिकांच्या हितासाठी अतिरिक्त कुमक पाठवून गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

पोलिस गस्त वाढविण्याचा प्रयत्न होईलच. परंतु रहिवाश्‍यांनीही आळीपाळीने आपापल्या परिसरात गस्त घालावी आणि चोरटा अथवा संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी तत्काळ संपर्क करून सहकार्य करावे. 
- प्रताप इंगळे, पोलिस निरीक्षक, जामनेर 

loading image