साहेब..श्रावण महिना तरी खानदेश कोरडाच!

Jalgaon Farmer News: विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण खानदेशात यंदा वार्षिक सरासरीच्या २५% पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे.
Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav Thackeray
Summary

शेतकऱ्यांच्या मागे हे सरकार ठाम उभे राहणार असून यात खानदेशचा विशेष प्राधान्याने विचार होईल.

अमळनेर ः "साहेब... श्रावण महिना असला तरी खानदेश कोरडाच आहे. पिकांची आशा जवळपास संपली आहे, अश्या कठीण परिस्थितीत शेतकरी राजाच्या वेदना पाहणे असह्य झाले आहेत. मी खानदेशातील पीडित शेतकऱ्यांच्या (Farmers) व्यथा मांडण्यासाठी आलोय." अशी आर्त हाक देत अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांनी तातडीने मुंबई (Mumbai) गाठून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. कोणत्याही परिस्थितीत खानदेशात दुष्काळ जाहीर करा.. हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करा,अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे केली.

Chief Minister Uddhav Thackeray
चिमुरड्या श्रीमदने केले कळसुबाई शिखर सर

विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण खानदेशात यंदा वार्षिक सरासरीच्या २५% पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. अमळनेर मतदारसंघच नव्हे तर संपुर्ण खानदेशातील जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने दुष्काळामुळे पीडित झालेल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडण्यासाठी मी याठिकाणी आलो असून माझा बळीराजा खूपच खचलाय.एकवेळा काय दुबार काय आणि तिबार काय पेरणीचे सारेच प्रयत्न फोल ठरले असून पिकांची आशा तर जवळपास संपलीच आहे, शेतकऱ्यांनी आता आशा सोडली आहे,आता पुढे काय? हा एकच प्रश्न प्रत्येकासमोर असून अश्या कठीण परिस्थितीत आपले महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशी ठाम उभे राहिल ही आस साऱ्या शेतकरी बांधवाना आहे.तरी साहेब खान्देशातील शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी आणि शेतकरी पुत्र म्हणून मी आपणास विनंती करतो की पूर्णपणे खचलेल्या आमच्या बळीराजास हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट विनाअट सानुग्रह अनुदान जाहीर करा,शेतीपंपाचे चालू वर्षाचे विज बिल माफ करा,गावोगावी गुरांसाठी चारा छावण्या सुरू करा,याव्यतिरिक्त जे जे करण्याजोगे असेल ते ते करा पण बळीराजाला धीर द्या अश्या मागण्या अत्यंत भावनाशील स्वरात आमदारांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केल्यात,व सदर मागण्यांचे लेखी निवेदन देखील आमदार अनिल पाटलांनी सादर केले.याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील देखील उपस्थित होते.

Chief Minister Uddhav Thackeray
पांझरा-कान कारखाना पुन्हा चर्चेत!

शेतकऱ्यांच्या मागे सरकार ठाम

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी देखील त्यांचे संपुर्ण म्हणणे काळजीने ऐकून घेत घाबरू नका. महाविकास आघाडी सरकार या भूमातेच्या सुपूत्रांचे असल्याने शेतकऱ्यांच्या मागे हे सरकार ठाम उभे राहणार असून यात खानदेशचा विशेष प्राधान्याने विचार होईल आणि पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आमदार पाटील यांना दिली.

Chief Minister Uddhav Thackeray
बीएचआर घोटाळा: सुनील झंवरच्या कोठडीसाठी १० मुद्यांचा आधार

३२ खेड्यांचा मांडला प्रलंबित अतिवृष्टी अनुदानाचा प्रश्न

अमळनेर तालुक्यात सप्टेंबर २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे पीडित झालेले ३२ खेड्यातील शेतकरी अनुदानापासून अजूनही वंचित असल्याने आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रश्न देखील काळजीपूर्वक मांडून त्वरित संबधित गावांना प्रलंबित अनुदान वितरित करावे अशी विनंती केली,यावर आमदारांना सकारात्मक आश्वासन देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com