
मात्र उद्घाटनाच्या पूर्वसंध्येलाच रात्री दहा वाजता मालट्रक व आयसर गाड्यांमध्ये कापूस भरून लांबच लांब रांग लागली आहे. शेतकऱ्यांना कापूस खरेदी केंद्राची चाहूल नसतानाही एवढा कापूस आला कुठून? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भुसावळ : तालुक्यातील कुऱ्हे ( पानाचे ) येथील साई जिनिंग येथे सीसीआय केंद्राचे 19 रोजी उद्घाटन करण्यात आले. मात्र केंद्राच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येलाच 18 रोजी रात्री दहा वाजेपासून अचानक कापसाच्या वाहनांची रांगा लागल्या आहेत. अजूनही वाहने उभीच असून, शेतकऱ्यांना माहीत नसतानाही एवढा कापूस आला कुठून ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकंदरीत व्यापारी साटेलोटे असल्याचे उद्घाटनापूर्वी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आवश्य वाचा- खिर्डीचा उत्कर्ष गिनीज बुक रेकॉर्डवर; अठरा वर्षापुर्वीचा रेकॉर्ड काढला मोडीत
तालुक्यात कुऱ्हे ( पानाचे ) येथील दोन व शिंदी येथे एक अश्या तीन जिनिंग मध्ये सीसीआय केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिंदी येथील जिनिंग मध्ये कापूस खरेदी सुरु होण्यास आठ दिवस झाले आहे. कुऱ्हे ( पानाचे ) येथे मात्र 19 रोजी उद्घाटन करण्यात आले . खरे , तर या सीसीआय केंद्रावरील कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन होणार असल्याची चर्चा अध्याप कुठेच नाही . मात्र उद्घाटनाच्या पूर्वसंध्येलाच रात्री दहा वाजता मालट्रक व आयसर गाड्यांमध्ये कापूस भरून लांबच लांब रांग लागली आहे. शेतकऱ्यांना कापूस खरेदी केंद्राची चाहूल नसतानाही एवढा कापूस आला कुठून? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रतवारीनुसार दर
भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय)तर्फे कुऱ्हे पानाचे येथील जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर यंदाच्या कापूस खरेदीला गुरुवारी (ता. 19) सुरूवात झाली. चांगल्या प्रतीच्या कापसाला 5725 एवढा भाव आहे. कापसातील आर्द्रता, धागा व प्रत पाहून दर निश्चित करण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. दरम्यान, फायद्यासाठी कापूस व्यापार्यांनी त्यांची वाहने रात्रीच केंद्रावर बोलवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
वाचा- भाऊबीजला भावाची बहिणीसाठी अनोखी भेट; सतराव्यांदा रक्तदान
वाहतुक कोंडीमुळे शेतकऱ्यांचे हाल
जिनिंग परिसरात कपाशी भरून आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्याने स्मशानभूमी जवळील, जिनिंग समोरील. तसेच रोडवरील शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले. तसेच इतरही वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला कपाशी ने भरलेली वाहने काही रस्त्यावर तर काही रस्त्याच्या बाजुला उभी केल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. याप्रसंगी वाहन चालक आणि ट्रक चालक यांच्या शाब्दिक वाद झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे कपाशी ने भरलेली वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.