esakal | अडीच हेक्टर जागेवरील अतिक्रमण हटवीले, ते ही शांततेत ! 
sakal

बोलून बातमी शोधा

अडीच हेक्टर जागेवरील अतिक्रमण हटवीले, ते ही शांततेत ! 

अडीच हेक्टरवरील वनक्षत्राच्या जागेवरील उभ्या पिकांवर वनविभागाने कुऱ्हाड चालवून उपटून फेकून दिले आहे हि कारवाई करत असताना कोणत्याही प्रकारचा संघर्ष या ठिकाणी झाला नाही

अडीच हेक्टर जागेवरील अतिक्रमण हटवीले, ते ही शांततेत ! 

sakal_logo
By
गजानन खिरडकर

मुक्ताईनगर ः वढोदा वनपरिक्षेत्रा अंतर्गत असलेल्या डोलारखेडा नियत क्षेत्रातील झालेल्या अतिक्रमणावर वनविभागाने धडक कारवाई करून उभे पिक उपटून फेकले आहे हि कारवाई करीत असताना कोणत्याही प्रकारचा संघर्ष झाला नाही हे विशेष या ठिकाणी पहावयास मिळाले आहे.वनविभागााने शनिवारी सकाळी हि कारवाई केली. 

वनविभागाने वढोदा वनक्षेत्रातील परिमंडळ डोलारखेडा नियतक्षेत्र दक्षिण डोलारखेडा मधील वनखंड क्रमांक 518 मध्ये गावातील माणिक देवराम बेलदार,श्रीमती गयाबाई देवराम बेलदार, मगन राजाराम बेलदार,निना मेघो सुर्यवंशी, रामदास श्रीपत जाधव, सोनाबाई बळीराम भोई, रतीराम राजाराम बेलदार सर्व रा.डोलारखेडा ता.मुक्ताईनगर यांनी मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्रातील वनजमिनीवर अवैद्य रित्या अतिक्रमण करून पिकपेरा केलेला होता. यात त्यांनी बाजरी ,कपाशी ,तुर आदी पिके पेरलेली होती.

वनविभागाने केली कारवाई 

अडीच हेक्टरवरील वनक्षत्राच्या जागेवरील उभ्या पिकांवर वनविभागाने कुऱ्हाड चालवून उपटून फेकून दिले आहे हि कारवाई करत असताना कोणत्याही प्रकारचा संघर्ष या ठिकाणी झाला नाही जवळपास अडीच हेक्टर वरील अतिक्रमण निर्मूलन यशस्वी पणे वनविभागाने केले हि कारवाई वनसंरक्षक डिगंबर पगार धुळे,विवेक होसिंग उपवनसंरक्षक जळगाव,उमेश वावरे विभागीय वनाधिकारी दक्षता धुळे,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसरंक्षक चिमाजी कामडे, डि.एल.पाटील कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार आर.जी.राणे वनपरिक्षेत्र अधिकारी गस्ती पथक जळगाव ,अमोल चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी वढोदा व क्षेत्रिय कर्मचारी मुक्ताईनगर ,रावेर,गस्तीपथक जळगाव वढोदा तसेच राज्य राखीव पोलिस दल धुळे,पोलिस कर्मचारी मुक्ताईनगर,महिला होमगार्ड,डोलारखेडा गावाचे पोलिस पाटील व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हि कारवाई करण्यात आली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top