खासदार रक्षा खडसेंनी तक्रार करताच तपासणी नाका मध्यप्रदेश हद्दीत !

महिलेला दवाखान्याची कागदपत्र दाखवल्यावर सुद्धा मध्यप्रदेश पोलिसांनी थांबवून गाडीच्या खाली उतरवून त्रास दिला.
खासदार रक्षा खडसेंनी तक्रार करताच तपासणी नाका मध्यप्रदेश हद्दीत !


मुक्ताईनगर : येथून अंतुर्ली परिसरात जाण्यासाठी ईच्छापूरमार्गे राष्ट्रीय महामार्ग (National Highways) हा मुख्य रस्ता असून, मध्यप्रदेश पोलिसांनी (Madhya Pradesh Police) लावलेल्या नाक्यामुळे परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांना हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी तत्काळ बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी प्रवीणसिंग (District Collector Barhanpur Praveen Singh) यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत ही बाब लक्षात आणून दिली, तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती देऊन तत्काळ ही पोलिस चौकी मध्यप्रदेश हद्दीत हलविण्याचा आदेश दिला असता ही चौकी हलविण्यात आली. (mp khadse complaint with district collector checkpoint was madhya pradesh)

खासदार रक्षा खडसेंनी तक्रार करताच तपासणी नाका मध्यप्रदेश हद्दीत !
अचानक शेतात वीज पडली..दैव बलवत्तर आणि 10 जणांचा जीव वाचला

कोरोना बंदोबस्तामुळे मध्यप्रदेश शासनाने लावलेल्या पोलिस नाक्यावर मुक्ताईनगर येथील रुग्णालयातून घरी जात असताना अंतुर्ली येथील ६ दिवसांच्या नवजात बाळ व सिझर शस्त्रक्रिया झालेल्या महिलेला दवाखान्याची कागदपत्र दाखवल्यावर सुद्धा मध्यप्रदेश पोलिसांनी थांबवून गाडीच्या खाली उतरवून त्रास दिला.

खासदार रक्षा खडसेंनी तक्रार करताच तपासणी नाका मध्यप्रदेश हद्दीत !
वरखेडेत पुन्हा बिबट्याचे दर्शन..आणि शेतकऱ्यांची उडाली झोप !


मागील वर्षीही या पोलिस चौकीमुळे अंतुर्ली येथील नागरिकास जीव गमवावा लागला होता. तेव्हा संतप्त नागरिकांनी पोलिस नाका हटविण्यासाठी आंदोलन केले असता खासदार रक्षा खडसेंनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जावून बऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून हा महाराष्ट्र राज्य सिमेत असलेला नाका शाहपूर रस्त्यावरील शिरसोदा फाट्यावर हलविण्यात आला होता. परंतु आता पुन्हा या तपासणी नाक्यामुळे परिसरातील ये-जा करणाऱ्या नागरिक, शेतकरी व वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे खासदार खडसे यांच्या प्रयत्नाने हा नाका मध्यप्रदेश हद्दीत हलविण्यात आला असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com