अचानक शेतात वीज पडली..दैव बलवत्तर आणि 10 जणांचा जीव वाचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lightning

अचानक शेतात वीज पडली..दैव बलवत्तर आणि 10 जणांचा जीव वाचला


रावेर : शेतात (Farm) काम करत असतांना अचानक ढगाच्या गडगडाटासह वीज (lightning) जवळच पडल्याने एकाच कुटुंबातील (family) दहा जणांचा दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात जीव वाचला. ही घटना तालुक्यातील विश्राम जिन्सी या सातपुड्यातील (satpuda) आदिवासी पट्ट्यातील (Tribal premises) गावात घडली. सर्वांना येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी आणण्यात आले आहे.

(lightning suddenly struck field ten people injured)

विश्राम जिन्सी येथील लक्ष्मण मोरसिंग पवार यांच्या घरच्या शेतात त्यांचे दोन्ही भाऊ, पत्नी आणि त्यांची मुले ठिबक सिंचन संचाच्या नळ्या टाकण्यासाठी गेले होते. दुपारी एकच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने सर्वजण मैदानात एका ठिकाणी बसले. मात्र, त्यांच्याजवळच अचानक वीज कोसळली.

lightning

lightning

सर्व दहा फुट दुर फेकले गेले

विजेच्या धक्क्याने सर्वजण आठ ते दहा फूट दूर फेकले गेले. सर्वांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. सर्वांगाची, छाती आणि तोंड यांची आग होणे, कान सुन्न होणे, अशी लक्षणे त्यांच्यात आढळून आली आहेत. वीज त्यांच्याशेजारी पडल्याने सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

हे आहेत जखमी..

किरकोळ जखमी झाल्यामध्ये बळिराम दल्लू पवार (वय २१), दिलीप लक्ष्मण पवार (वर २१), अरविंद साईराम पवार (वय १५), ईश्वर दल्लू पवार (वय १५), कमलसिंग लक्ष्मण पवार (वय २०), अनिल लक्ष्मण पवार (वय २७), बिंदुबाई लक्ष्मण पवार (वय ५०), साईराम मोरसिंग पवार (वय ३७), मलखान मोरसिंग पवार (वय ४५), लक्ष्मण मोरसिंग पवार (वय ५५) यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असून, उपचार चालू आहेत.

टॅग्स :FarmersatpudaFarm