टोलप्लाझाचा अजब तर्क; अपघाताचे खापर फोडले फुलझाडांवर आणि केली कत्तल !

एल. बी. चौधरी 
Tuesday, 3 November 2020

महामार्गावर काही ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्राचा फलक लावून अपघात होतात हे कंपनी स्वतःच कबूल करीत आहे. विशेष म्हणजे तो फलकही झाडांमुळे दिसत नाही.

सोनगीर : मुंबई आग्रा महामार्गावर नुकतेच दोन जणांचा बळी गेल्यानंतर अपघात कमी करण्यासाठी टोलप्लाझा प्रशासनाने काय करावे? फुलझाडे अर्धे छाटून टाकले तर क्रासिंगलगतची पूर्ण काढून टाकली. फुलझाडांमुळेे विरुद्ध ट्रॅकवरील वाहने दिसत नाही. म्हणून अपघात होतात असे टोलप्लाझा प्रशासनाने अजबचा तर्क लावला. दररोज निष्पाप जीव बळी जातांना नॅशनल हायवे अथाॅरिटी झोपा काढते आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल न बनविल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. 

आवश्य वाचा- सिनेस्टाईल बंदूक हातात घेवून युवकाने काढला फोटो; याच फोटोमूळे झाला गजाआड !

सोनगीर येथील वाघाडी फाटा अपघात प्रवण क्षेत्र झाला असून तेथे उड्डाणपूल व सर्व्हीस रोड न देता महामार्गावर वाघाडीकडे जाण्यासाठी क्रॉसिंग दिली. मात्र सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. विशेष म्हणजे शिरपूरकडून येणाऱ्या वाहनांना येथे उतार असल्याने भरधाव वेगाने वाहने येतात. त्याचवेळी वाघाडीकडून येणारी वाहने क्राॅस करत असतांना सर्वाधिक अपघात होतात. टोलप्लाझा कंपनीने उड्डाणपूल न देता अपघात कमी करण्यासाठी महामार्गावर अक्षरशः अवैधरित्या गतिरोधक टाकले. 

रस्ता बांधणीत केली चुक 

सोनगीर, वाघाड़ी फाटा, देवभाने फाटा, बाभळेफाटा, कलमाड़ी फाटा, सरवड़ फाटा, धमाणे येथे उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग नाही. दोन्ही बाजूंनी किमान सर्व्हीस रोड देखील नाही. त्यामुळे महामार्गावरील रस्ता बांधणीत चूक केली असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 

 

अपघात प्रणवक्षेत्र फलक झाडांमध्ये
दरम्यान महामार्गावर काही ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्राचा फलक लावून अपघात होतात हे कंपनी स्वतःच कबूल करीत आहे. विशेष म्हणजे तो फलकही झाडांमुळे दिसत नाही. अपघात प्रवण क्षेत्र ठेवायचे होते तर चौपदरीकरण कशाला? दरम्यान वाघाडी फाट्याजवळ जागा ब्लॅक स्पाॅट ठरवून तेथे उपाययोजना करण्यासाठी टोलप्लाझाला भाग पाडू असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितले.

वाचा- फिरायला गेले अन्‌ सारे गमावून बसले; रस्‍त्‍यावर लूट
 

अपघातांचे खापर फुलझाडांवर

 तेव्हा टोलप्लाझा प्रशासनाने चक्क निष्पाप झाडे तोडून फुलझाडेही छाटून टाकली तर क्राॅसिंग जवळची फुुलझाडे पूर्णपणे तोडून टाकली. अखेर अपघाताचे खापर फुलझाडांवर फोडून टोलप्लाझा प्रशासन मोकळे झाले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news songir danger spot accident mumbai-agra highway broke flowers