तापी-पूर्णाचे जल…संत मुक्ताबाई समाधीस्थळाची माती अयोध्येला जाणार !

दिपक चौधरी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई समाधीस्थळाची माती जी संत मुक्ताई सातशे वर्षांपूर्वी विजेच्या रूपात अंतर्धान ज्या भुमीत‌ झाल्या.

मुक्ताईनगर : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मंदिर भुमीपूजन कार्यक्रमास अखील भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ आश्रम फैजपुर येथील महामंडलेश्वर प.पू. जनार्दन हरिजी महाराज यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.

महाराष्ट्रातील वारकर्याचे चार धामपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई समाधीस्थळाची माती जी संत मुक्ताई सातशे वर्षांपूर्वी विजेच्या रूपात अंतर्धान ज्या भुमीत‌ झाल्या व जेथे वारकरी संप्रदायातील जेष्ठश्रेष्ठ थोर संत प.पू. जोग महाराज, मामासाहेब दांडेकर, धोंडोपंतदादा, सद्गुरू झेंडूजी महाराज, सद्गुरुसखाराम महाराज अनेक थोर महापुरुषांनी इथले रजकण आपल्या भाळी लावून ज्या भुमीला नतमस्तक झाले अशी पवित्र माती व चांगदेव येथील तापी‌पूर्णा संगमाचे पवित्र जल आज शनिवार 1ऑगस्ट रोजीस.11वा. महामंडलेश्वर प.पू.जनार्दन हरिजी महाराज , श्री‌संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रविंद्र पाटील खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील , ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांचे हस्ते विधीवत पूजन करून संकलीत करण्यात येणार आहे. संपूर्ण खानदेश , विदर्भातील रामभक्तांचे वतिने प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज संत मुक्ताबाई भुमीतील पवित्र जल व माती घेवून अयोध्येकडे प्रस्थान करणार आहेत. 

जनार्दन महाराज जल व माती घेवून जाणार
अखील भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ आश्रम फैजपुर येथील महामंडलेश्वर प.पू. जनार्दन हरिजी महाराज यांना राम मंदिर भूमीपुजन कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले असून. तापीपूर्णा संगमावरील पवित्र जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील पवित्र माती सोबत आणावी असे सांगितले आहे. त्यानुसार जनार्दन महाराज जल व मुक्ताबाईच्या समाधीस्थळाची माती घेवून जाणार आहे. 

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar Water of Tapi-Purna rivhar and Sant Muktabai Samadhisthala soil will go to Ayodhya